Breaking

Bacchu Kadu : मुख्यमंत्री शेतात वखरायला गेले होते का?

Prahar’s Attack on Chief Minister Devendra Fadnavis : आम्हालादेखील बोलता येतं अन् तुमच्यापेक्षाही वाईट बोलता येतं

Amravati : सत्ताधाऱ्यांनी पैसे दिले म्हणजे काही त्यांच्या घरातून दिलेले नाहीत. मुख्यमंत्री काय शेतात वखरायला गेले होते का, असा संतप्त सवाल करत प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हल्ला चढवला आहे. ‘आमचे पैसे आहेत, आमचा अधिकार आहे’, असे टोमणे मारणे बंद करा. आम्हालादेखील बोलता येतं अन् तुमच्यापेक्षाही वाईट बोलता येतं, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे.

बच्चू कडू यांनी अमरावतीमध्ये आज (४ ऑगस्ट) पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, काल (३ ऑगस्ट) शासकीय कार्यक्रमात सत्ताधाऱ्यांनी राजकीय भाषण दिलं. त्यांना लाज वाटायला पाहिजे. पैसा सरकारचा अन् भाषण राजकीय, हे चालणार नाही. असं बोलायचं असेल तर स्वतःचे पैसे खर्च करा अन् राजकीय सभा घ्या. शासकीय कार्यक्रमांमध्ये राजकीय भाषण करणार असाल तर तुमच्यासारखे महामुर्ख कुणी नाही. या प्रकाराची आम्ही तक्रार करू. महत्वाच्या कार्यक्रमात स्थानिक आमदारांनी बोलू दिलं नाही, हे खपवून घेतलं जाणार नाही.

Ministers bungalow : मंत्रीपद गेलं 42 लाखाचा दंड तरी ‘सातपुडा’ सोडवेना!

आज संत्र्याबद्दल बोलायला कुणीही तयार नाही. रामदेवबाबांनी कारखाना सुरू केला असं सांगता. मग भाव काय देणार आहात, हे जाहीर करा ना.. कालच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एखादे राजकीय पॅकेज जाहिर करतील, असं वाटलं होतं. पण त्यांनी राजकीय भाषण केलं, हे चालू देणार नाही. धर्माच्या नावाखाली सुरू असलेली तुमची गुंडागर्दी बंद होणार आहे. आमची नौटंकी काढल्यापेक्षा तुमची ‘सातबारा कोरा..’ ची नौटंकी बंद करा, असे बच्चू कडू यांनी सुनावले आहे.

Political events : राजकीय वातावरण तापले ‘सप्टेंबरमध्ये मोठा स्फोट’ !

चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नौटंकी म्हटले आहे. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. शेतकऱ्यांच्या वेदना बावनकुळेंना कळत नाहीत. सहा लाख शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या. त्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश आहे. हा आक्रोश रस्त्यावर आला आहे. याला तुम्ही नौटंकी म्हणणे योग्य नाही. शेतकऱ्यांना शिव्या देणे बावनकुळे यांनी बंद केले पाहिजे, असेही बच्चू कडू यांनी सुनावले आहे.