I didn’t mention Bachchu Kadu’s name : गरीब माणसाचे कर्ज माफ करण्यासाठी कमिटी केली आहे
Nagpur : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नौटंकी म्हटल्यावरून प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे. याबाबत आज महसूल मंत्री बावनकुळे यांना विचारणा केली असता, ‘मी बच्चू कडू यांचं नाव घेतलं नाही. पश्चिम महाराष्ट्रात अनेक नेते नौटंकी करत आहेत. त्यांच्याबद्दल मी बोललो. माझं ते विधान बच्चू कडू यांच्यासाठी नव्हतं’, असे ते म्हणाले.
नागपुरात आज (४ ऑगस्ट) पत्रकारांशी बोलताना महसूल मंत्री बावनकुळे यांनी उपरोक्त खुलासा केला. ते म्हणाले. काही लोक सभागृहात प्रश्न मांडत नाहीत. मात्र बाहेर जाऊन नौटंकी करतात. बच्चू कडू यांनी सांगितलेल्या बैठका आम्ही घेतल्या. दिव्यांग बांधवांचा महिना वाढला. तरीही काही ठिकाणी नौटंकी सुरू आहे, परवा दांडी यात्रा निघाली. अशी आंदोलने सुरू आहेत. गरीब माणसाचे कर्ज माफ झाले पाहिजे, यासाठी कमिटी तयार केली आहे. यासाठी आठ दिवसांनंतर बैठक घेणार आहो.
Chandrashekhar Bawankule : जनतेमध्ये आक्रोश निर्माण झाला की असा निर्णय घ्यावा लागतो !
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत प्रश्न विचारला असता, अगदी उद्याही निवडणूक झाल्यास भाजप तयार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यांत मेळावे होतील. धाराशीव, बुलढाणा या भागात जाणार आहो. विधानसभा निवडणुकीप्रमाणे ५१ टक्के मते घेऊन आम्ही जिंकणार आहो. खासदार दुबे यांच्याबाबत बोलताना कुणी कुणाचे राजकारण संपवत नाही. कुणी कुणावर टिका करण्यापेक्षा महाराष्ट्राचा विकास करण्याचे काम केले पाहिजे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.