Breaking

Bhartiya Seva Sadan : बनावट मृत्युपत्राच्या आधारे ३० एकर जमीन हडपली

30 acres of land seized on the basis of a fake will : गोयनका कुटुंबीयांविरोधात रुंगटा यांची तक्रार

Akola भारतीय सेवा सदनच्या उपाध्यक्षांसह गोयनका कुटुंबीयांनी बनावट दस्तऐवज तयार करून तब्बल ३० एकर शेती हडपल्याचा गंभीर आरोप राजकुमार जुगलकिशोर रुंगटा यांनी केला आहे. त्यांनी बोरगाव मंजू पोलीस स्टेशन आणि आर्थिक गुन्हे शाखेत याप्रकरणी तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून योग्य कारवाई न झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

मृत व्यक्तींच्या नावे बनावट मृत्युपत्र?
फिर्यादी रुंगटा यांच्या मते, त्यांच्या वडिलांचे डॉ. जुगलकिशोर ओंकारमल रुंगटा यांचे निधन ७ नोव्हेंबर २०१८ रोजी तर त्यांच्या आजी श्रीमती मोहिनीबाई ओंकारमल रुंगटा यांचे निधन ७ नोव्हेंबर १९९९ रोजी झाले. या दोघांच्या निधनानंतर तब्बल अनेक वर्षांनी बनावट मृत्युपत्र (वसियत) तयार करून, त्याआधारे मजलापूर व जलालाबाद येथील ३० एकर शेती भरतराज गोयनका आणि निरंजनकुमार गोयनका यांनी हडपल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Narahari Zirwal : कोकाटे नंतर आता झिरवाळ वादात, अधिकारी आक्रमक,

 

पोलीस कारवाईबाबत गंभीर प्रश्न
बोरगाव मंजू पोलिसांनी ७ जुलै रोजी तक्रार दाखल करूनही ११ जुलै रोजी ती फेटाळल्याचे समोर आले आहे. यामागे “हे प्रकरण दिवाणी न्यायालयाचे आहे” हे कारण देण्यात आले. यावरून पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप फिर्यादीने केला. तक्रार निकाली काढण्याच्या कृतीवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, न्याय न मिळाल्यास कायदेशीर लढ्यासाठी तयार असल्याचेही सांगितले.

गुन्हे शाखेची चौकशीही अपुरीच?
पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांची भेट घेतल्यानंतर प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या लेखी जबाबाची नोंद घेण्यात आली, मात्र आरोपकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, गोयनका कुटुंबीयांची ना चौकशी झाली, ना त्यांचे जबाब घेण्यात आले.

Ashwni Vaishnav : वंदे भारतला अकोल्यात थांबा द्या, खासदारांची मागणी

“हे फक्त अफलातून नव्हे, तर फसवणुकीचे ठळक उदाहरण” – रुंगटा
“मृत व्यक्तींनी त्रयस्थ व्यक्तींना मृत्युपत्र तयार करून देणे शक्यच नाही. वारसांना डावलून अन्य व्यक्तींना शेती हस्तांतरित करणे हा प्रकार अत्यंत गंभीर असून, बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता बळकावली गेली आहे,” असा आरोप राजकुमार रुंगटा यांनी केला.

मुख्यमंत्र्यांकडे धाव घेण्याचा इशारा
“पोलिसांनी योग्य कारवाई न केल्यास राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जाईन,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.