38 villages in Shegaon taluka without water : पाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन
Shegao जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील १४० गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शेगाव तालुक्यातील ३८ गावे समाविष्ट असूनही, गेल्या अनेक दिवसांपासून या गावांना पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) यांच्या वतीने मंगळवारी शेगाव-वरवट मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
किडनीच्या आजारांचे प्रमाण वाढले; शुद्ध पाण्याची मागणी
या भागातील जमीन खारपाणपट्ट्यात येते. त्यामुळे अनेकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध न झाल्याने किडनीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. गावकऱ्यांना नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली.
Ladki bahin yojana : जिल्ह्यातील ५१ हजार लाडक्या बहिणींची ‘ओवाळणी’ होल्डवर!
हे आंदोलन राष्ट्रवादी नेत्या नंदा पाऊलझगडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. सुमारे अर्धा तास चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनानंतर, पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.