Breaking

Randhir Sawarkar : लाडक्या बहिणींचा अपमान राज्य सहन करणार नाही

MLA criticizes Mahavikas Aghadi for not being able to digest defeat : आमदार रणधीर सावरकर यांचा काँग्रेसला इशारा

Akola काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधकांनी सातत्याने महाराष्ट्राच्या मतदारांचा अपमान करणे थांबवावे. जर निवडणुकांवर शंका घेण्याचा निर्धार असेल, तर त्यांनी आधी विधानसभेचा राजीनामा द्यावा, असे प्रत्युत्तर भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार रणधीर सावरकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिले.

“मतपेटीतून जनतेने दिलेला स्पष्ट संदेश काँग्रेस व महाविकास आघाडीला पचवता आलेला नाही,” असा टोला त्यांनी लगावला. “लाडकी बहीण आणि मातृशक्तीचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही,” असा रोषही त्यांनी व्यक्त केला.

Crime increased in Amravati : खून, चोऱ्या वाढल्या; गुंडगिरीवर लगाम राहिला नाही!

आज राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राचा अवमान करण्यात आला, याचा तीव्र निषेध आमदार सावरकर यांनी केला. राहुल गांधींच्या आरोपांना जोरदार उत्तर देताना, काँग्रेस आणि विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेवर त्यांनी टीकास्त्र सोडले.

ते पुढे म्हणाले, “प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने कोणतेही आक्षेप नोंदवले नाहीत. केवळ ३,९०० आक्षेप प्राप्त झाले होते, त्यापैकी फक्त ९८ आक्षेप वैध ठरले. आज मतदार याद्यांवर आणि मतदान प्रक्रियेवर टीका करणाऱ्यांनी याचे उत्तर द्यावे.”

महाविकास आघाडी आणि काँग्रेसने शेवटच्या टप्प्यात मतदान वाढल्याचा आरोप केला आहे. यावर टीका करताना सावरकर म्हणाले, “दिवसभरातील तासानुसारची आकडेवारी का लपवली जाते? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित केले. त्यानुसार लोक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले, यात चूक काय?”

Shikshak Bank Recruitment Scam : सात जणांवर ठपका, १५०० पानी दोषारोपपत्र दाखल

आमदार आशीष शेलार म्हणाले, “मतदान वाढले की विरोधकांची तक्रार सुरू होते, मतदार याद्यांमध्ये सुधारणा केली तरही आरोप होतात. लोकसभा निवडणुकीत मतदानवाढीचा फायदा झाला, तेव्हा ते स्वीकारतात. पण विधानसभा निवडणुकीत जनतेने नाकारल्यावर मात्र आरोप करतात. ही विरोधकांची दुटप्पी भूमिका आहे.”