Breaking

Uddhav Balasaheb Thackarey : “व्हीव्हीपॅट न वापरण्याचा निर्णय तुघलकी आणि मनमानी!”

Shiv Sena criticizes election commission over VVPAT : शिवसेना प्रवक्त्या जयश्री शेळके यांची निवडणूक आयोगावर टीका

Buldhana राज्य निवडणूक आयोगाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर होईल, मात्र व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार नाही, असा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, हा निर्णय “तुघलकी आणि मनमानी पद्धतीचा” असल्याची जोरदार टीका केली आहे.

राज्यात दिवाळीनंतर जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि महानगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी ऑक्टोबरअखेरीस निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांमध्ये केवळ ईव्हीएमचा वापर होईल, परंतु मतदारांनी टाकलेले मत व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून पडताळता येणार नाही, अशी अधिकृत माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

Randhir Sawarkar : लाडक्या बहिणींचा अपमान राज्य सहन करणार नाही

या निर्णयामुळे निवडणुकीविषयी सामान्य मतदारांमध्ये शंका निर्माण होण्याचा धोका असून, मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे म्हणत जयश्री शेळके यांनी आक्षेप नोंदवला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणे स्थानिक निवडणुकांमध्येही व्हीव्हीपॅटचा वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नुकतीच उत्तर महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत नाशिकमध्ये बैठक घेऊन निवडणूकपूर्व तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, या निवडणुकांमध्ये केवळ ईव्हीएमचा वापर करण्यात येणार असून व्हीव्हीपॅट वापरण्यात येणार नाही.

Makrand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा

जयश्री शेळके यांनी पुढे सांगितले की, “मतदारांनी दिलेले मत नेमके कुणाला गेले, हे पाहण्याचा हक्कही मतदारांकडून हिरावून घेतला जात आहे. लोकशाहीच्या मुल्यांना हरताळ फासणारा हा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा, अन्यथा जनतेमध्ये असंतोष उफाळून येईल.