Breaking

Thrill of kidnapping :राजकीय वैमनस्यातून अपहरणाची थरारक घटना !

Padalkars worker kidnapped by Rohit Pawar supporter : रोहित पवार समर्थकाकडून पडळकर यांचा कार्यकर्ता पळवला

Solapur : गुरुवारी रात्री उशिरा राजकीय वैमनस्यातून अपहरणाची थरारक वघटना घडली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर कार्यकर्ते शरणू हांडे याचे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांचा समर्थक अमित सुरवसे याने घरासमोरून मारहाण करून अपहरण केले. अक्कलकोट रोडवरील साईनगर येथे घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली. सुरवसे आणि त्याच्या तीन साथीदारांनी हांडे याला कारमध्ये घालून कर्नाटकात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक माहितीनुसार, आरोपींचा उद्देश खून करण्याचा होता.

घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. आरोपींचा पाठलाग करत कर्नाटकातील झळकी येथे त्यांचा शोध लावला. रात्री सुमारे अकराच्या सुमारास हांडे याची सुटका करण्यात आली आणि अमित सुरवसेसह चार जणांना ताब्यात घेऊन सोलापुरात आणण्यात आले.

Department of Animal Husbandry : लम्पी प्रादुर्भावामुळे बुलढाण्यात पाच तालुके ‘नियंत्रित क्षेत्र’ घोषित

या वैमनस्याची पार्श्वभूमी 2021 मध्ये आहे. त्या वेळी गोपीचंद पडळकर यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत शरद पवारांवर सडकून टीका केली होती. त्याच्या निषेधार्थ अमित सुरवसे याने पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक केली होती. त्याचा बदला म्हणून मे 2025 मध्ये शरणू हांडे याने सुरवसेला मारहाण करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या घटनेनंतर दोघांनीही वाद मिटवला होता.

Prataprao Jadhav-Siddharth Kharat : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून पेटला श्रेयवाद

तथापि, जुन्या अपमानाचा बदला घेण्यासाठी सुरवसेने पुण्यातून भाड्याने कार घेऊन साथीदारांसह सोलापुरात येत हांडे याचे अपहरण केले. पोलिसांच्या तत्परतेमुळे हांडे याची सुटका झाली असली तरी या घटनेमुळे राजकीय वातावरणात पुन्हा तणाव निर्माण झाला आहे.