Breaking

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा शब्द झाला पूर्ण, रक्षा बंधनाच्या पूर्वसंध्येला धानाचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात !

Mungantiwar’s promise was fulfilled, paddy bonus deposited in farmers’ accounts on the eve of Raksha Bandhan : जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण, आतापर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात २२८ कोटी रूपये जमा.

Chandrapur : राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी एखादा प्रश्न हाती घेतला की तो निकाली निघालाच समजायचा. त्यामुळेच ‘दिला शब्द – केला पूर्ण’, हे ब्रिद जनतेने त्यांना बहाल केले. चंद्रपूर जिल्हा हा वीज उत्पादक असण्यासोबतच धान उत्पादक जिल्हा आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. पण तरीही ते बिनधास्त असतात. कारण सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखा दूरदृष्टी असलेला, जिद्दी आणि अभ्यासू नेता या जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतो.

जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना धानाच्या बोनसची नितांत गरज होती. शेतकऱ्यांनी ही बाब आमदार मुनगंटीवार यांच्या कानावर घातली. त्यांनीही बोनस मिळवून देण्याचा शब्द दिला आणि हा प्रश्न हाती घेतला. यासाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. मुंबईत झालेले अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि पावसाळी अधिवेशनात त्यांनी हा मुद्दा लाऊन धरला. शासनानेही त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत धानाच्या बोनसची त्यांची मागणी पूर्ण केली. विशेष उल्लेखनीय म्हणजे आज (९ ऑगस्ट) रक्षा बंधन आहे. या सणाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच काल (८ ऑगस्ट) सायंकाळी बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली.

Scolded in strong words : बदमाशांसारखे वागू नका, भामटेपणा सोडा

आमदार मुनगंटीवार यांनी धानाच्या बोनससाठी सभागृहात शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला. मुख्यमंत्र्यांना पत्र दिले, त्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची निकड त्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतरही जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात बोनसची रक्कम जमा होत नाही, तोपर्यंत सातत्याने पाठपुरावा केला. शेतकऱ्यांप्रति संवेदनशील असलेल्या मुनगंटीवारांनी शेतकऱ्यांच्या खात्यात बोनसची रक्कम जमा करून दिलेला शब्द पूर्ण केला आणि ‘दिला शब्द – केला पूर्ण’ची प्रचिती पुन्हा एकदा दिली. मागील सरकारमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या पिक विम्याचे २०२ कोटी रुपये मंजूर करवून घेतले होते.

Raksha Khadse : ‘आज जे सुरू आहे त्याच्या वेदना मलाही होतात’

सदैव शेतकऱ्यांसोबत…
आमदार सुधीर मुनगंटीवार हे नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. याआधी त्यांच्या पुढाकारातून चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विक्रमी २०२ कोटी रुपयांचा पीक विमा मिळवून देण्यात आला होता. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हेक्टरी २० हजार प्रमाणे प्रत्येकी दोन हेक्टर धानाच्या बोनससंदर्भातील त्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यासाठी २२८ कोटी रुपयांचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत त्यांची संवेदनशीलता, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि लढण्याची तयारी हेच त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य आहे.