Breaking

Crime News : एकनाथ शिंदे यांचा पीए आहे असे सांगत लाखोंची फसवणूक !

Being cheated in various cases in the name of different ministers : वेगवेगळ्या प्रकरणात विविध मंत्र्यांच्या नावाने गंडवले

Jalgaon : नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवत अनेकांची फसवणूक झाल्याचे दोन प्रकरण समोर आले आहेत, एका प्रकरणात एका दाम्पत्याने आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक आहोत असे भासवले. तर दुसऱ्या प्रकरणात एकाने विविध मंत्री आणि उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे नाव वापरून ही लूटमार केल्याचे समोर आले आहे. या प्रकारात नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

जळगावमध्ये एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक असल्याचे सांगत हितेश संघवी व अर्पिता संघवी या पती-पत्नींनी 18 जणांची तब्बल ₹55 लाखाची फसवणूक केली. पाचोरा येथील रहिवासी असलेले आणि सध्या नवी मुंबईत राहणारे हे दाम्पत्य ओळखपत्र, लेटरपॅड व बनावट अपॉइंटमेंट लेटर दाखवून सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत पैसे उकळत होते. या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

Maharashtra politics : विधानसभेपूर्वी 160 जागांची गॅरंटीची ऑफर; आम्ही नाकारली !

नाशिकमध्ये अभिषेक प्रभाकर पाटील या युवकाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री गिरीश महाजन यांचा पुतण्या व आमदार गुलाबराव पाटील यांच्याशी जवळीक असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. त्याने निफाड तालुक्यातील औरंगपूर येथील एका युवतीच्या पालकांकडून पोलीस दलात नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत ₹4,50,000 ची फसवणूक केली. तक्रारीनंतर सायखेडा पोलिसांनी त्याला अटक केली असून तपास सुरू आहे.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा शब्द झाला पूर्ण, रक्षा बंधनाच्या पूर्वसंध्येला धानाचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात !

या दोन्ही प्रकरणांमुळे नोकरीच्या आमिषाने होणाऱ्या फसवणुकीबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलीस नागरिकांना अशा प्रकारच्या ‘ओळखीच्या’ आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन करत आहेत.