Sharad Pawar questions the election process again : शरद पवारांकडून निवडणूक प्रक्रियेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
Nagpur : मतदानानंतरच्या आकडेवारीत झालेल्या अचानक वाढीवरून निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वाढलेली 76 लाख मते आणि मतदानाच्या शेवटच्या तासात झालेली 15 टक्क्यांची वाढ हा गंभीर विषय असल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. “मी सुरुवातीपासूनच यावर बोलत आहे,” असे स्पष्ट करत पवारांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर थेट प्रश्न उपस्थित केले.
नागपुरात आज प्रेस क्लबमध्ये आयोजित ‘मीट द प्रेस’ मध्ये शरद पवार म्हणाले की, “पक्षांतर बंदी कायदा असताना ज्या बाबाने पोराला जन्म दिला, त्या पोराला बापाच्या जवळून काढून दुसऱ्याला देणारे हे निवडणूक आयोग आहे.” तसेच, निवडणूक आयुक्त निवडणाऱ्या समितीतून सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांना वगळून एका कॅबिनेट मंत्र्याला ती जागा देण्यात आली, तेव्हाच या “षड्यंत्राला” सुरुवात झाली.
Crime News : एकनाथ शिंदे यांचा पीए आहे असे सांगत लाखोंची फसवणूक !
राम कमल दास नावाच्या व्यक्तीला एका वर्षात तीन मुले कशी झाली, अशा उदाहरणाद्वारे मतदान यादीतील अनियमिततेचा मुद्दा पवारांनी उपस्थित केला. चिखली येथे न राहणाऱ्या लोकांनी मतदान केल्याचा आरोपही करण्यात आला, तर राहुल बोंद्रे यांचे नाव घेऊन या संदर्भातील माहिती विचारण्याचे आवाहन त्यांनी केले. राहुल गांधींकडून अफिडेव्हिट मागण्यावर प्रश्न उपस्थित करत, शरद पवार यांनी “त्यांनी खासदाराची शपथ घेतली आहे, तेवढे पुरेसे आहे,” असे स्पष्ट केले.
Maharashtra politics : विधानसभेपूर्वी 160 जागांची गॅरंटीची ऑफर; आम्ही नाकारली !
पवारांच्या आरोपानुसार, मतदानाच्या एक दिवस आधीच पक्षांना मतदार यादी देण्यात आली. राहुल गांधी यांनी मतांची तपशीलवार मोजणी करून प्रत्येक अनियमितता दाखवून दिल्याचेही पवार यांनी सांगितले. या वक्तव्यांमुळे वाढीव मतांची आकडेवारी, मतदार यादीतील विसंगती आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर पुन्हा वादळ उठण्याची शक्यता बळावली आहे.