Breaking

Maharashtra politics : “खोटं बोलायचं आणि पळून जायचं, हे पळपुटे लोक”

Devendra Fadnavis reply to Sharad Pawar : देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना प्रत्युत्तर

Mumbai : शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत दोन जण भेटून 160 मतदारसंघांत विजय मिळवून देण्याची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया देत पवारांच्या आरोपांचे खंडन केले.

फडणवीस म्हणाले, “विरोधक कितीही संभ्रम निर्माण करू पाहोत, भारतासारख्या पारदर्शक आणि मुक्त पद्धतीने निवडणुका जगात कुठेच होत नाहीत. ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर आरोप करणारे लोक जनतेत बोलतात, पण आयोगाने बोलावल्यावर जात नाहीत, शपथपत्र द्यायलाही तयार नसतात. संसदेतील शपथ सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयात चालत नाही. कारण त्यांना माहिती आहे, खोटं पकडलं गेलं तर फौजदारी कारवाई होईल. त्यामुळे रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं, हे पळपुटे लोक आहेत.”

Maharashtra politics : विधानसभेपूर्वी 160 जागांची गॅरंटीची ऑफर; आम्ही नाकारली !

फडणवीसांनी प्रश्न उपस्थित केला की, “इतक्या दिवसांनी पवार साहेबांना ही गोष्ट का आठवली? राहुल गांधी यांना भेटल्यानंतरच का हा खुलासा केला? राहुल गांधी जसे सलीम-जावेदच्या स्क्रिप्टप्रमाणे रोज कपोलकल्पित कहाण्या सांगतात, तशीच अवस्था पवार साहेबांची तर झाली नाही ना?”मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे पवार–फडणवीस शाब्दिक संघर्षाला नवीन वळण मिळाले आहे.

______