Claims of consistent follow-up for assistance of Rs 74.45 crore : ७४.४५ कोटींच्या मदतीसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याचा दावा
बुलढाणा :जून महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे फटका बसलेल्या ९० हजार ३८३ शेतकऱ्यांना ७४ कोटी ४५ लाख रुपयांची मदत शासनाकडून मंजूर झाली आहे. या मदतीवरून जिल्ह्यात श्रेयवादाची लढाई रंगली आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, पालकमंत्री मकरंद पाटील आणि आमदार सिद्धार्थ खरात यांच्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनीही या लढाईत उडी घेतली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात २५ व २६ जून रोजी जिल्ह्यात ढगफुटीसदृश प्रचंड पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. जमिनी खरडून गेल्या होत्या, पिके उध्वस्त झाली होती तर फळबागांचे देखील अतोनात नुकसान झाले होते. दरम्यान रविकांत तुपकर यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला होता आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासन दरबारी असे आश्वासन देखील शेतकऱ्यांना दिले होते.
Digitization of documents : बुलढाण्यात एका क्लिकवर मिळणार ११७ वर्षांचे अभिलेख!
त्यानुसार रविकांत तुपकर यांनी प्रथमतः जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले व त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री यांना देखील निवेदन पाठवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. त्यानंतर रविकांत तुपकर यांनी मुंबई गाठून विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. व त्यांनी सरकारला मदत देण्याचे निर्देशही दिले होते.त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील ८७ हजार ३९० हेक्टर जमिनीचे नुकसान होऊन ९० हजारावर शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा फटका बसला होता, या शेतकऱ्यांना विनाअट तातडीने नुकसान भरपाई मंजूर करावी आणि दिलासा द्यावा, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी लावून धरली होती.
Politics in gram panchayat : ग्रामपंचायत अधिकाऱ्याची बदली रोखण्यासाठी आत्मदहनाचा इशारा!
दरम्यान आता शासनाने 6 ऑगस्ट रोजी एका परिपत्रकाद्वारे अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर केली आहे. जिल्ह्यातील ९० हजार ३८३ अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना ७४.४५ कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. ही मदत आपल्यामुळेच मिळाल्याचा दावा आता रविकांत तुपकर यांनी केला आहे.