Breaking

Sanjay Khodake : प्रशासनाने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावे

MLA appeals to the administration to reach out to the last segment of society : न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत; आमदारांनी व्यक्त केली अपेक्षा

Amravati “मेळघाटमध्ये काम करणे आजही आव्हानात्मक आहे. निती आयोगाच्या सहकार्याने आकांक्षित भागाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण कार्य झाले आहे. प्रशासनाने शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत,” असे प्रतिपादन आमदार संजय खोडके यांनी केले.

जिल्हा नियोजन सभागृहात ‘संपूर्णत:’ अभियानाचा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी आमदार प्रवीण तायडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, विभागीय महिला व बालविकास अधिकारी विलास मसराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.

Jagdeep Dhankhar : जगदीप धनखड यांच्या गायब होण्यावरून खळबळ

आमदार खोडके म्हणाले, “जिल्ह्याच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकापर्यंत शासकीय योजना पोहोचल्या पाहिजेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सत्कार हे केलेल्या कार्याचे मुल्यमापन आहे. योजनांमुळे नागरिकांचे दारिद्र्य कमी करण्यास मदत होईल. मागासलेल्या भागांमध्ये शाळा सुटल्यामुळे बालविवाह होत आहेत, त्यामुळे शिक्षण विभागाने यावर लक्ष ठेवून कार्यवाही करावी. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभागाने नवीन योजना आखाव्यात. तसेच शेतमाल विक्रीसाठी एकाच ठिकाणी सुविधा निर्माण केल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.”

आमदार प्रवीण तायडे म्हणाले, “समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित कार्य केले पाहिजे. समस्यांचे त्वरित निराकरण झाल्यास लोकप्रतिनिधींना तक्रारी कमी येतील. समस्यांवर सक्रीयपणे काम करणे हीच खरी लोकसेवा आहे.”

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आकांक्षित तालुक्यात आरोग्य, माती परीक्षण, दळणवळण या क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य झाल्याचे नमूद केले. “केवळ उद्दिष्ट गाठणे नव्हे, तर परिणामकारक कामगिरी होणे आवश्यक आहे. मेळघाटातील बालमृत्यू आटोक्यात आला असला तरी मातामृत्यू टाळण्यासाठी अल्पवयीन विवाह रोखणे गरजेचे आहे. कमी वयात गर्भधारणा टाळणे आणि दोन मुलांमध्ये योग्य अंतर राखण्यासाठी जनजागृती होणे अत्यावश्यक आहे,” असे ते म्हणाले.

मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी, “मेळघाटातील अधिकारी-कर्मचारी प्रतिकूल परिस्थितीत काम करत असल्याची जाणीव आहे. प्रशासन ही जनतेची सेवा आहे, त्यामुळे प्रत्येकाने प्रामाणिकपणे कार्य केले पाहिजे. गरजूंपर्यंत पोहोचून आपल्या कार्यक्षेत्राचा विकास घडवून आणावा,” असे आवाहन केले.

Sharad Pawar : शरद पवारांचं एकनाथ शिंदेच्या दिल्ली भेटीवर गूढ वक्तव्य

या कार्यक्रमात धारणी व चिखलदरा तालुक्यातील आरोग्य विभाग, तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी विभाग, जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन विभाग, तालुका कृषी कार्यालय, बालविकास कार्यालय, राष्ट्रीय जीवनोन्नती अभियान, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार चिखलदऱ्याचे गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी मानले.