Breaking

Vande Bharat : वंदे भारतसाठी नगर ते पुणे वेगळी लाईन होणार

Chief Minister Devendra Fadnavis gave technical information about Nagpur-Pune railway line : अहिल्या नगर ते पुणे आणि अहिल्यानगर ते छत्रपती संभाजी नगर नवीन कॉरीडोर होणार

Nagpur : नागपूर (अजनी) ते पुणे ही नवी वंदे भारत रेल्वे कालपासून (१० ऑगस्ट) सुरू झाली आहे. यामुळे नागपूरकर आणि पुणेकरांना चांगली सुविधा मिळाली आहे. सामान्य रेल्वे गाड्यांनी या प्रवासाला १६ ते १७ लागतात. पण आता वंदे भारतने केवळ १२ तासात पोहोचता येणार आहे. हे अंतरही कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

वंदे भारत रेल्वेचे काल उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, रेल्वेच्या अॅथोरीटीसोबत चर्चा केली आहे. सद्यस्थितीत ही गाडी नगरवरून दौडला जाते आणि तेथून पुण्याला जाते. सुमारे शंभर ते दीडशे किलोमीटर डी रुटीन करण्यात येते. त्यामुळे वेळही तेवढाच जातो. म्हणून नगवरून थेट पुण्यापर्यंत लाईन करण्याबाबत त्यांना सुचवले आहे. या लाईनमुळे अंतर कमी होऊन वेळही वाचेल. यासाठी रेल्वे मंत्रालयाशी बोलून हे काम करणार आहे.

Mohan Bhagwat : शिक्षण-आरोग्य सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर !

छत्रपती संभाजी नगर ते पुणे असा नवा एक्सप्रेस वे होत आहे. त्याच्या राईट ऑफ वे मध्ये आपल्याला ही रेल्वे लाईन समांतर करता आली तर नागपू पुणे अंतर १०० पेक्षा जास्त किलोमीटरने कमी होईल. अहिल्यानगर ते पुणे आणि अहिल्यानगर ते छत्रपती संभाजी नगर हा संपूर्ण औद्योगित पट्टा आहे. त्याच्या पलिकडे पुण्याहून आता तीन लाईन आहेत. त्या पाच लाईन करण्याचे काम सुरू आहे. JNPT पोर्ट अशी कनेक्टिव्हीटी करावी लागेल. याबाबत मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आहे. हे जर आपण करू शकलो तर नवीन मालवाहतूक कॉरिडोर आपण तयार करू शकणार आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

छत्रपती संभाजीनगर ते पुणे अशी एक अलाइनमेंट तयार करण्यात आली आहे. त्यांना आम्ही आमची अलाइनमेंटची ऑफर देऊ. आमचे भूमी संपादन ज्या स्टेजला आहे, तेथून आम्ही त्यांना राईट ऑफ वे देऊ शकतो. हे दोन्ही इंटीग्रेट झाले तर नव्याने भूमी संपादन न करता इंटिग्रेट करता येईल. समृद्धी महामार्गाला लागून जी समांतर ट्रेन असेल ती हाय स्पीड ट्रेन राहावी, असा प्रयत्न आहे. अडीचशे ते तीनशे किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी ती रेल्वे असेल.

Chandrashekhar Bawankule : शरद पवार यांची ‘मंडल यात्रा’ म्हणजे नौटंकी, बावनकुळेंची टीका

मागील काळात रेल्वे मंत्रालयाने नागपूर ते मुंबई रेल्वेचा अभ्यास केलेला आहे त्यावेळी समृद्धी महामार्ग तयार होत होता. त्या अभ्यासाला समृद्धीसोबत इंटिग्रेट करण्याचा प्रयत्न केला. मात्र समृद्धीच्या नंतर आम्ही इंटिग्रेट केला तर आमच्या लक्षात आले 78% राईट ऑफ वे आमच्यासोबत आहे. बावीस टक्के राईट ऑफ हवा जो स्टेशन सोबत इंटिग्रेट करावा लागेल. जो आमच्यासोबत नाही, त्याबाबत केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयासोबत आम्ही चर्चा करणार आहोत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.