Breaking

Gopinath Munde : मुंडे साहेबांना मुख्यमंत्री करण्याचा विचार केला होता

Fadanvis evoked memories at the unveiling of the statue : पुतळा अनावरण प्रसंगी फडणवीस यांनी जागवल्या आठवणी

Latur : माजी केंद्रीय मंत्री आणि लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण लातूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी फडणवीसांनी मुंडे साहेबांच्या संघर्षमय प्रवासाच्या आठवणी सांगत 2014 च्या निवडणुकांतील एक खास किस्सा शेअर केला. देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र” असा नारा मुंडे साहेबांनी दिला होता. मात्र, सत्ता आल्यावर आम्ही त्यांनाच मुख्यमंत्री करण्याचा विचार केला होता. मोदींना ‘उधारीवर’ मुंडे साहेबांना दिलं त्यांना परत आणून मुख्यमंत्रीपदी बसवू असा माझा निर्धार होता. दुर्दैवाने, ते शक्य झाले नाही,” असे फडणवीस भावूक होत म्हणाले.

फडणवीसांनी मुंडे आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मैत्रीचाही विशेष उल्लेख केला. “आज दोन्ही नेत्यांचे पुतळे एकमेकांच्या शेजारी आहेत, हे वेगळेपण आहे,” असे ते म्हणाले. मराठवाड्याच्या विकासाविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “पूर्वीच्या सरकारने मराठवाड्याला तहानलेले ठेवले, पण सत्तेत आल्यानंतर आम्ही बीडपर्यंत पाणी पोहोचवले.

Income Tax Bill : लोकसभेत सुधारित आयकर विधेयक सादर

मुंडे साहेबांचे मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न आम्ही पूर्ण करू. गोदावरी परिक्रमेचे स्वप्नही साकार करू. रेल्वे प्रकल्पांची कामे सुरू आहेत.”यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी लातूरच्या पाणीपुरवठा योजनेस तसेच सामान्य रुग्णालयाला तत्काळ मान्यता दिल्याची घोषणा केली. “तुमची सेवा म्हणजे मुंडे साहेबांची सेवा,” असेही त्यांनी नमूद केले.

_____