Jaya Bachchans video goes viral Kangana is furious : जया बच्चन यांचा व्हिडिओ व्हायरल; कंगनाचा संताप
Mumbai : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री आणि समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन पुन्हा एकदा त्यांच्या रागीट स्वभावामुळे चर्चेत आल्या आहेत. सोशल मीडियावर सध्या त्यांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या एका व्यक्तीवर चिडून ओरडताना आणि धक्का देताना दिसत आहेत. या घटनेवर अभिनेत्री व भाजप खासदार कंगना रनौत यांनी जया बच्चन यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
व्हिडिओमध्ये दिसते की, जया बच्चन एका व्यक्तीसोबत उभ्या राहून संवाद साधत असतात. दरम्यान, दुसरा व्यक्ती त्यांच्या जवळ येऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो. हे पाहून जया बच्चन अचानक भडकतात, त्याला धक्का देतात आणि जोरात ओरडतात. जया बच्चन यांच्या अशा वागण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी त्यांनी लोकांशी उग्रपणे वागल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र, यावेळी व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी चांगलेच नाराज झाले आहेत.
Administration : प्रशासकीय रचना, कामकाजाच्या प्राधान्यक्रमात बदल !
या प्रकरणावर कंगना रनौत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत जया बच्चन यांना सुनावले आहे. कंगना म्हणाल्या “बिघडलेली आणि हक्क गाजवणारी महिला. लोक यांचे नखरे आणि बकवास यासाठी झेलतात कारण या अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आहेत. ही समाजवादी पार्टीची टोपी त्यांच्या डोक्यावर कोंबडीच्या तुऱ्यासारखी दिसतेय. त्या स्वत: कोंबडीसारख्या दिसत आहेत. लज्जास्पद गोष्ट आहे ही.”
Chandrashekhar Bawankule : पालकमंत्र्यांच्या ‘किचन ३६५’ भेटीवर युवक काँग्रेसचा संताप!
कंगनाची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत असून, सोशल मीडियावर जया बच्चन यांच्या वागणुकीबाबत तीव्र चर्चा सुरू आहे. काहीजण त्यांना सार्वजनिक ठिकाणी संयम ठेवण्याचा सल्ला देत आहेत, तर काही समर्थक त्यांच्या बाजूनेही बोलत आहेत.








