Within a few days, got post of NCPs general secretary directly : काही दिवसांतच थेट मिळाले राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीसपद
Mumbai : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काही दिवसांपूर्वीच हाकलण्यात आलेले सूरज चव्हाण पुन्हा चर्चेत आले आहेत. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाटगे यांना झालेल्या मारहाण प्रकरणात चव्हाण यांचे नाव समोर आले.
या घटनेनंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, ते काही दिवस फरार राहिले, आणि अखेर अजित पवार यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. कायद्याला हात घालणाऱ्यांवर कुठलीही हयगय होणार नाही, असा ठाम संदेश पवार गटाकडून देण्यात आला होता.
मात्र, केवळ काही दिवसांतच परिस्थिती पालटली आणि सूरज चव्हाण यांची थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. या निर्णयाने पक्ष आणि राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राष्ट्रवादीच्या अधिकृत फेसबुक पेजवर याबाबत माहिती देत चव्हाण यांचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे, “महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस पदी सूरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या वाढीसाठी आणि ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी चव्हाण यांना शुभेच्छा.”
अलीकडेच ज्यांच्यावर अमानुष मारहाणीचे गंभीर आरोप झाले, ज्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला, त्यांनाच काही दिवसांत मोठी जबाबदारी देण्यात येणे हा विरोधाभासी निर्णय मानला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत निर्णयप्रक्रियेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आणि राजकीय वर्तुळात याबाबत चांगलीच चर्चा होऊ लागली मला वाईट सवय लावून घेतलेला आहे.