व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Police Special Service Medal : नक्षलग्रस्त भागातील सेवेसाठी बुलढाण्यातील ४ पोलिसांना ‘विशेष...

Police Special Service Medal : नक्षलग्रस्त भागातील सेवेसाठी बुलढाण्यातील ४ पोलिसांना ‘विशेष सेवा पदक’

Medals awarded to 4 policemen for service in Naxal-affected areas : गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील कारवायांना आळा घालण्याची कामगिरी

Buldhana गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हिंसक आणि बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्यासाठी विशेष सेवा बजावलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील चार पोलिस अधिकाऱ्यांना आणि अंमलदारांना महाराष्ट्र पोलीस महासंचालकांकडून ‘विशेष सेवा पदक’ जाहीर करण्यात आले आहे.

या सन्मानासाठी निवड झालेल्यांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय प्रताप विजय बाजड, बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत पोका रामेश्वर किसन आंधळे, जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे सुपाजी निनाजी तायडे आणि खामगाव सीसीटीएनएसचे पंचगंगा भगवान भोजने यांचा समावेश आहे.

Vote theft : मतचोरीविरोधात काँग्रेसचा मशाल मोर्चा, नेते एकवटले

प्रताप विजय बाजड यांनी मार्च २०२१ ते जुलै २०२४ दरम्यान गडचिरोलीत नक्षलविरोधी मोहीम यशस्वीरीत्या राबवली. निवडणुका शांततेत पार पाडण्याबरोबरच मुला-मुलींसाठी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली. तसेच नक्षलग्रस्त भागात ग्रंथालय अभियान राबवून नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास दृढ केला. या उपक्रमांमुळे ७९ नक्षलग्रस्त युवक-युवती शासकीय सेवेत दाखल झाले.

रामेश्वर किसन आंधळे यांनी २०१२ ते २०२४ या काळात हेड्री येथे कार्यरत राहून नक्षलविरोधी अभियानात मोलाची कामगिरी बजावली. कम्युनिटी पोलिसिंगद्वारे शासनाच्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवून पोलिसांची प्रतिमा उंचावली. सुपाजी निनाजी तायडे यांनी २०११ ते २०२४ दरम्यान इंटेलिजन्स सेलमध्ये कार्यरत राहून महत्त्वपूर्ण गुप्त माहिती गोळा केली आणि वरिष्ठांना सादर केली, ज्यामुळे नक्षलवादी कारवाया रोखण्यात मदत झाली.

Pankaj Deshmukh death case : पंकज देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणी सीआयडी चौकशीची करा

पंचगंगा भगवान भोजने यांनी २०१० ते २०२२ दरम्यान निवडणूक शाखा आणि पोलीस कल्याण शाखेत कार्य करताना नक्षलग्रस्त भागातील सुरक्षेसाठी उल्लेखनीय योगदान दिले. या चार अधिकाऱ्यांचे अभिनंदन पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी सुनील अंबूलकर आणि पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण पाबरा यांनी केले आहे.

error: Content is protected !!