Tiranga Yatra : अकोल्यात भव्य तिरंगा यात्रा; आकाश फुंडकर काँग्रेसवर बरसले

Fundkar criticizes Congress for insulting martyrs : राहुल यांच्याकडून शहिदांचा अपमान होत असल्याची टीका

Akola स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने अकोला जिल्ह्यात भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. रेल्वे स्टेशन परिसरातून निघालेल्या या यात्रेत पालकमंत्री आकाश फुंडकर, आमदार रणधीर सावरकर आणि खासदार अनुप धोत्रे यांसह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.

यावेळी पालकमंत्री आकाश फुंडकर म्हणाले, “स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांच्या विचारधारेचा अपमान करून काँग्रेस आणि राहुल गांधी देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. तिरंग्याचा आणि संविधान संस्थांचा अपमान केला जात आहे. घुसखोरांना नागरिकत्व देण्याचे काम काँग्रेस व उद्धवसेना करत असल्याचा आरोप त्यांनी केला.”

Vote theft : मतचोरीविरोधात काँग्रेसचा मशाल मोर्चा, नेते एकवटले

फुंडकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांसाठी ऐतिहासिक योजना सुरू केली असून त्यामध्ये १५ हजार रुपये थेट नागरिकांच्या खात्यात जमा होणार आहेत. याशिवाय देशाला तंत्रज्ञानात आघाडीवर नेण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी विविध योजना सुरू आहेत.

“मोदींनी हर घर तिरंगा अभियानातून जनमानसात राष्ट्रभक्तीची भावना निर्माण केली आहे. देश हा सर्वांचा आहे, काही मोजक्यांचा नाही, हे कृतीतून सिद्ध केले,” असेही त्यांनी सांगितले.

Pankaj Deshmukh death case : पंकज देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणी सीआयडी चौकशीची करा

या यात्रेत आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, महानगर अध्यक्ष जयंत मसने, माजी महापौर विजुभाऊ अग्रवाल, तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.