Heavy bore blasting : हेवी बोर ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थांचे जीवन धोक्यात !

Damage victims in Haldgaon-Parsodi area of Nagpur district are angry with the administration : हळदगाव-परसोडी परिसरातील नुकसानग्रस्तांचा प्रशासनावर संताप

Umred – Nagpur : नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील चांपा, हळदगाव, परसोडी, उटी, सायकी आणि आसपासच्या गावांमध्ये क्रेशर प्लांटमधील सातत्याने होणाऱ्या हेवी बोर ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थांचे जीव धोक्यात आले आहेत. या स्फोटांमुळे अनेक घरांना मोठमोठे तडे गेले आहेत. जमीन भूकंपासारखी हादरते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. क्रेशर प्लांट मालकांवर तात्काळ कारवाई करावी आणि नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत प्रशासनाने द्यावी, यासाठी चांप्याचे माजी सरपंच अतिश पवार सरसावले आहेत.

हळदगाव आणि परसोडी परिसरातील डझनभर क्रेशर प्लांटमधून दररोज होणाऱ्या हेवी बोर ब्लास्टिंगमुळे अनेक कुटुंबांचे जीवन धोक्यात आले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांच्या घरांचे मोठे नुकसान झाल्याचे विष्णू पांडुरंग कुलसंगे यांनी सांगितले. “आमच्या घराच्या भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. दररोजच्या स्फोटांमुळे घर कधीही कोसळेल, अशी भीती वाटते.” प्रकाश मुकुंदा वलके यांनीही याच भावना व्यक्त करत म्हटले की, “हेवी ब्लास्टिंगमुळे आमचे घर राहण्यायोग्य राहिले नाही. प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, नाहीतर मोठी दुर्घटना घडू शकते.” सत्यपाल शामराव आडे यांच्या घराचीही तीच परिस्थीती आहे.

Ajit Pawar Vs Jayant Patil : ‘ते’ देखणं नेतृत्व, मग आम्ही काय देखणे नाही का?

“क्रेशर प्लांटच्या स्फोटांमुळे आमच्या घरांचे नुकसान झाले आहे. आम्हाला रात्री झोप येत नाही, कारण कधी काय होईल याची खात्री नाही.” सुधाकर लहू कुलसंगे यांनीही याला दुजोरा देत म्हटले, “आमच्या मुलांच्या सुरक्षेची चिंता वाटते. प्रशासनाने आमच्या नुकसानाची भरपाई करावी आणि ब्लास्टिंग बंद करावी.” वंदना राजहंस मेश्राम यांनी सांगितले की, “आमच्या घराला पडलेल्या भेगा पाहून आम्ही हादरलो आहोत. ही परिस्थिती असह्य झाली आहे.”

Chandrashekhar Bawankule : पारधी समाजाच्या विकासाचा नागपूर पॅटर्न राज्यभर राबवणार !

अक्षय चंद्रमणी सहारे यांनी चिंता व्यक्त करत म्हटले, “हेवी ब्लास्टिंगमुळे जमीन हादरते, जणू भूकंप होत आहे. आमच्या घरांचे नुकसान झाले असून, यापुढे मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.” किलेश किशोर कुशराम यांनीही याला पाठिंबा देत सांगितले की, “प्रशासनाने आमच्या व्यथा ऐकाव्या आणि तात्काळ उपाययोजना कराव्या.” रणवीर बाजीराव आडे यांनीही प्रशासनावर नाराजी व्यक्त करत सांगितले, “आमच्या घरांचे नुकसान होत आहे, पण कोणीही जबाबदारी घेत नाही. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे.”

Mahajan Vs Raut : ठाकरे बंधू एकत्र आले तर रस्त्यावर फिरणं मुश्कील होईल !

या ब्लास्टिंगमुळे केवळ घरांचे नुकसानच झाले नाही, तर धूळ आणि खराब रस्त्यांमुळे ग्रामस्थांचे दैनंदिन जीवनही असह्य झाले आहे. अतिश पवार यांनी तहसीलदारांना याबाबत निवेदन दिले आहे. क्रेशर प्लांटच्या अनियंत्रित ब्लास्टिंगमुळे होणारे नुकसान आणि ग्रामस्थांचे हाल थांबवण्यासाठी प्रशासन काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.