Chandrashekhar Bawankule : केव्हा होणार महानगरपालिका निवडणुका? बावनकुळेंनी सांगूनच टाकले..

BJP claims to win more than 120 seats in Nagpur Municipal Corporation : नागपूर महापालिकेत १२० पेक्षा अधिक जागा निवडून येण्याचा केला दावा

Nagpur : गेल्या दोन ते तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची वाट बघीतली जात आहे. कित्येक माजी नगरसेवकांनी या काळात बऱ्याचदा निवडणुकीची तयारी केली अन् मोडून टाकली. न्यायालयाच्या निकालानंतर या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण अद्याप मुहूर्त निघालेला नाही. अशा परिस्थितीत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महानगरपालिकेच्या निवडणुका केव्हा होणार, हे स्पष्टच सांगून टाकले.

नागपुरात बडकस चौक मित्र परिवाराच्यावतीने दहीहींडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी महसूल मंत्री बावनकुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुका डिसेंबर २०२५ किंवा जानेवारी २०२६मध्ये होतील, असे जाहिरपणे सांगितले. याशिवाय नागपूर महानगरपालिकेत १२० पेक्षा अधिक जागा जिंकून येतील, असा दावा केला. तर मध्य नागपुरात आपले पूर्णच्या पूर्ण उमेदवार निवडून येतील आणि विरोधकांना शून्य जागा मिळतील, असाही दावा केला.

Heavy bore blasting : हेवी बोर ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थांचे जीवन धोक्यात !

मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात पूर्ण ताकद या निवडणुकीत लावायची आहे, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांवर पूर्ण विश्वास दाखवत त्यांच्यात जोश भरला. राज्याचे जबाबदार मंत्री बावनकुळे यांनी डिसेंबर किंवा जानेवारीत महापालिकेच्या निवडणुका होतील, असे दहीहंडीच्या कार्यक्रमात जाहिरपणे सांगितल्यामुळे निवडणुकांची वेळ जवळपास निश्चित मानली जात आहे. भाजप हा वर्षभर इलेक्शन मोडवर राहणारा पक्ष आहे आणि बावनकुळेंच्या घोषणेनंतर इतर राजकीय पक्षही अॅक्टीव मोडवर येतील, यात काही शंका वाटत नाही.