Dada Bhuse : अमरावतीच्या मनपा शाळांचं रुपडं पालटणार?

Education Minister announces funds for municipal schools : शिक्षण मंत्र्यांनी केली निधीची घोषणा; पाणी, स्वच्छतेवर देणार भर

Amravati अमरावती महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सध्या 500 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांच्या विकासासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिले. या निधीतून शाळेच्या इमारती, स्वच्छतागृहे आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मनपाच्या जेवडनगर येथील शाळेत आयोजित सामूहिक कवायतीच्या कार्यक्रमात मंत्री भुसे बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार रवी राणा, कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे, मनपा आयुक्त सौम्या शर्मा आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

Maharashtra Politics : ‘ हो सरकार मी पाडलं, पण त्यांनीच मला मुख्यमंत्री केल’

मंत्री भुसे यांनी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि शिस्त वाढवण्यासाठी कवायत कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, शिक्षकांच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे शाळेतील विद्यार्थीसंख्या वाढली असून अशा प्रयोगशील शाळांना शासन मदत करेल.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध कवायतीचे सादरीकरण केले. लेझीम पथकाने मंत्र्यांचे स्वागत केले. तसेच तिरंगा रॅली काढण्यात आली. शाळेतील मुलांनी तयार केलेल्या हस्तकला दालनाचे उद्घाटन मंत्री भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समर्पण संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

Chandrashekhar Bawankule : पारधी समाजाच्या विकासाचा नागपूर पॅटर्न राज्यभर राबवणार !

मंत्री भुसे यांनी पालकांना मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले. त्यांनी मोबाईलचा वापर मर्यादित ठेवून मुलांचे ज्ञान वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.