Shashikant Khedkar : सिंदखेड राजा व देऊळगाव राजात ओला दुष्काळ जाहीर करा

Declare a wet drought in Sindkhed Raja and Deulgaon Raja : शशिकांत खेडेकर यांच्या नेतृत्वात एसडीओंना निवेदन

Sindkhed raja सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यात सततच्या पावसामुळे कपाशी, सोयाबीन, फळबागा आणि बीजोत्पादनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळले असून सरसकट ओला दुष्काळ घोषित करून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गट शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.

या मागणीसाठी आज उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ. खेडेकर यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की, “शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघाले नाही, तर शेतकरी रस्त्यावर उतरतील.”

Black Box GPS : केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचा ट्रॅक्टर मोर्चा

शशिकांत खेडेकर यांनी सांगितले की, पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत आणि ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना योग्य आर्थिक मदत द्यावी. या निवेदनावेळी जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी, उपजिल्हाप्रमुख बाबुराव मोरे, उपजिल्हाप्रमुख दिनकर खरात, विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख शिवप्रसाद ठाकरे, तालुकाप्रमुख वैभव देशमुख, शहरप्रमुख गोपाल व्यास यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.