Changes in ward structure of Lonar Municipal Council : नगरसेवकांची संख्या १८ वरून २०, जुन्या गडांवर धोका
Lonar नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांच्या चर्चेनंतर अखेर १८ ऑगस्ट २०२५ रोजी लोणार नगर परिषदेच्या १० प्रभागांची प्रारूप रचना जाहीर करण्यात आली. यावेळी नगरसेवकांची संख्या दोनने वाढवून १८ वरून २० करण्यात आली आहे. प्रभाग वाढीमुळे लोकसंख्या आणि क्षेत्रफळाचा समतोल साधत प्रभागांचे पुनर्विभाजन करण्यात आले असून, यामुळे शहरातील राजकीय समीकरणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
या नव्या रचनेत पारंपरिक मतदारसंघांत बदल झाला असून, काही अनुभवी नेत्यांचे गड मोडले आहेत. विश्वासू मतदारवर्ग विभाजित झाल्याने अनेक नेत्यांना आपली रणनीती बदलावी लागणार आहे. तर काही प्रभागात दोन बळकट नेते समोरासमोर आल्याने तीव्र स्पर्धा निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर नव्या चेहऱ्यांसाठी संधी उपलब्ध झाली आहे.
Solar damage due to rain : मुख्यमंत्र्यांच्या दालनात आत्महदन करण्याचा इशारा
२०११ च्या जनगणनेनुसार नगरसेवकांची संख्या वाढवून २० करण्यात आली आहे. प्रभागवाढीमुळे काही भाग पूर्णपणे नव्याने उदयास आले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत कोणालाही ठोस पकड नसल्याने प्रत्येक पक्षाला जनतेसमोर विश्वासार्ह उमेदवार उभा करण्याचे आव्हान असेल.
Local Body Elections : प्रारूप प्रभाग रचना जाहीर, काहींची राजकीय प्रतिष्ठा पणाला
प्रारूप रचनेवर नागरिकांना व संबंधितांना हरकत नोंदविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर प्रशासन अंतिम आराखडा जाहीर करणार आहे. या मुदतीत अनेक हरकती येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोणारमधील हा प्रभाग बदल आगामी निवडणुकीत कोणत्या नव्या समीकरणांना जन्म देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








