Nana Patole : आता अजित दादांनी बोलू नये, हेच बरं !

Congress leader Nana Patole’s advice to NCP chief Ajit Pawar : ३० दिवस जेलमध्ये टाकायचे अन् सरकार पाडायचे, हेच यांचे धोरण

Nagpur : गेल्या वर्षी लोकसभेच्या निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळाले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीचा जो निकाल लागला, त्यावर खुद्द अजित पवारांचाही विश्वास बसत नव्हता. त्यामुळे आता अजित दादांबद्दल मी काही बोलावं, असे मला वाटत नाही. ही धर्म आणि अधर्माची लढाई आहे. त्यांनी कुणाच्या बाजुने बोलावं, हा त्यांचा विषय आहे. खरं तर अजित पवारांनी या विषयावर बोलूच नये, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले म्हणाले.

नागपुरात आज (२१ ऑगस्ट) आयोजित पत्रकार परिषदेत नाना पटोलेंनी केंद्र सरकारच्या नव्या बिलाचा कडाडून विरोध केला. ते म्हणाले केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून कारवाई करायची, लोकांना तुरुंगात टाकायचे, हेच सरकारचे धोरण राहिलेले आहे. यासाठी न्यायालयाने त्यांना अनेकदा फटकारलेही आहे. तरीही एजन्सीजचा दुरूपयोग सुरूच आहे. आता ३० दिवस जेलमध्ये टाकायचे अन् सरकारे पाडायची, हे यांचे नियोजन आहे. सर्वपक्षीय समितीकडे बिल गेले आहे, तेव्हा त्यावर प्रतिक्रिया देता येईल.

Nana Patole : फडणवीसांना दिल्लीत पाठवण्याची तयारी चाललीय का ?

मतदार वाढल्याच्या आरोपाबाबत विचारले असता, आजही निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर कुठेही मतदार यादी दिसत नाहीये. समोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. ऐन वेळेवर यादी प्रसिद्ध करणार असतील आणि त्यात अनेकांची नावे वगळली जाणार असतील, तर ते मान्य होणार नाही. फ्रॉड करून निवडणुकी जिंकल्या जात असतील तर खपवून घेतले जाणार नाही. त्यांनी मतदार यादी वेबसाईटवर जाहिर केली पाहिजे, असे नाना पटोले म्हणाले.