India Pak Cricket : भारत पाक क्रिकेट म्हणजे सट्टेबाजीचा बाजार !

Where is the governments patriotism Sanjay Rauts attack : सरकारचं राष्ट्रप्रेम कुठं? संजय राऊतांचा हल्लाबोल

Mumbai : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारत – पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे हा “सरकारचा नालायक पणा” असून, हा खेळ नसून युद्ध आहे, असं सांगत त्यांनी क्रिकेटमागे मोठा पैसा आणि सट्टेबाजी असल्याचा आरोप केला. “ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही, मग पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

राऊत म्हणाले, “पाकिस्तानसोबत पाणीपुरवठा बंद केला, व्यापार बंद केला, मेडिकल व्हिसादेखील बंद केला. पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवलं. मग क्रिकेट खेळण्यासाठी का उघडं दार ठेवलं आहे? भारत-पाकिस्तान क्रिकेट म्हणजे सगळ्यात मोठं सट्टेबाजीचं केंद्र आहे, आणि त्यातील सर्वाधिक उलाढाल गुजरातमध्येच होते. मग कोणाच्या हितासाठी हे सामने घेतले जात आहेत?”

Maratha Movement : मराठा आरक्षण आंदोलनाआधी सरकारचा मोठा निर्णय !

जय शाह यांचा थेट उल्लेख करत राऊत म्हणाले, “आज क्रिकेटचे सूत्रधार जय शाह आहेत आणि त्यांचे वडील देशाचे गृहमंत्री आहेत. राष्ट्रीय भावना फक्त आम्ही जपायच्या, आणि यांच्या मुलाबाळांनी पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने मंजूर करायचे? हा कोणता राष्ट्रवाद? हे मी देशद्रोह म्हणतो.”
|क्रिकेटमधून भारत पाकिस्तानला शरण जात असल्याचे सांगत राऊतांनी सरकारवर तीव्र टीका केली. “पाकिस्तान आपल्याला शरण आलंय, मग आपण क्रिकेटमध्ये त्यांना शरण का जातो आहोत? हे धर्मयुद्ध आहे असं मोदी आणि त्यांचे लोक वारंवार म्हणायचे. मग क्रिकेटला अपवाद का?” असा सवाल त्यांनी केला.

Mahayuti meeting : महायुतीच्या रणनीतीसाठी वर्षा बंगल्यावर गुप्त बैठक

ठाकरे गटाकडून भारत – पाक क्रिकेट सामन्यांना जोरदार विरोध होत असताना, राऊतांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी कापताना पाहायला मिळत आहे.

______