ICMR scientists will look into hair loss incident : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी दिली बाधित गावांना भेट
Buldhana शेगांव तालुक्यातील केस गळती आजाराचे निदान अद्याप होऊ शकलेले नाही. कुणी पाण्याला दोष देत आहेत. तर कुणी आणखी काही शंका व्यक्त करत आहेत. पाण्याचे व केसांचे नमुने नागपूरच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. पण अद्याप केस गळती कशामुळे झाली, याचे निदान होऊ शकलेले नाही. त्यामुळे आता दिल्लीतील ICMR चे शास्त्रज्ञ येऊन अभ्यास करणार आहेत.
संशोधनासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR)चे शास्त्रज्ञ दाखल होणार आहेत. या आजाराचे लवकरात लवकर निदान करुन योग्य उपचार केले जातील. नागरिकांनी घाबरून जाऊ, असे आवाहन आज केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. केस गळती आजाराने बाधित झालेल्या शेगांव तालुक्यातील पहुरजिरा, कालवड, कठोरा, भोंनगाव आणि बोंडगांव गावांना जाधव यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी बाधित रुग्णांची विचारपूस करुन त्यांना धीर दिला.
Dr. Pankaj Bhoyar: लोकसंख्या वाढतेय, पाणी पुरवठ्याचे नियोजन करा
‘केस गळतीची घटना देशात पहिल्यांदाच घडली आहे. हा विचित्र आजार असला तरी घाबरुन जाऊ नका. या आजाराची केंद्र सरकारनेही दखल घेतली आहे. या आजाराचे निदान व संशोधनासाठी आयसीएमआरचे शास्त्रज्ञ आणि दिल्ली व चेन्नईचे आयुर्वेद, युनानी, ॲलोपॅथी व होमीयोपॅथीच्या तज्ञ डॅाक्टरांची टीम दाखल होणार आहे. ते तपासणी करणार आहेत. ११ गावांतील ३३ पाणी नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील १४ पाणी नमुन्यात नायट्रेटचे प्रमाण जास्त असले तरी त्यामुळे केस जात नसल्याचे तज्ञांचे मत आहे. फंगल इन्फेक्शन नसल्याचेही कळते. स्कीन बायअप्सीचे चाचणी अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल लवकरच प्राप्त होईल,’ असे जाधव यांनी सांगितले.
अन्न व औषध प्रशासनाने बाधित गावातील घरगुती वापरातील शॅम्पू, तेल, साबनाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होईल. शास्त्रज्ञांकडून निदान झाल्यानंतर बाधितांवर योग्य उपचार केले जातील. सध्या बाधित गावांमध्ये आरोग्य यंत्रणा कार्यरत असून प्राथमिक उपचार केले जात आहेत, असंही जाधव म्हणाले.
Nitin Gadkari : सर, हेल्मटशिवाय गाडी चालवणाऱ्याला जेलमध्ये टाकता येईल का ?
युद्धस्तरावर प्रयत्न सुरु आहेत. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. लक्षणे आढळून आल्यास आरोग्य यंत्रणेवर संपर्क साधा, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्र्यांनी केले. तसेच या प्रकरणी राज्याचे आरोग्य मंत्री सातत्याने लक्ष ठेवून आहेत. या आजाराशी लोणार सरोवरच्या पाण्याचा संबंध नसल्याचे निदर्शनास येते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या दौऱ्यादरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. अमोल गिते, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.