Ravindra Chavhan : प्रत्येक जाती-धर्मांमध्ये भाजपचा प्रचार करा, प्रदेशाध्यक्षांचे आवाहन

Campaign BJP among every caste and religion: वैद्यकीय आघाडीच्या संमेलनात ऑनलाईन हजेरी, स्थानिक निवडणुकीची तयारी

Akola : “समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचवून वैद्यकीय क्षेत्राचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपाची वैद्यकीय आघाडी कार्यरत राहावी. तसेच विदर्भात भारतीय जनता पक्षाचा सर्व जाती-धर्मांमध्ये प्रचार वाढवून पक्षाशी नाते दृढ करण्यासाठी प्रयत्न करावेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा महायुतीला विजय मिळवून देण्यासाठी वैद्यकीय आघाडीने महत्त्वपूर्ण भूमिका बजवावी,” असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले.

स्थानिक मराठा मंगल कार्यालयातील नामदेवराव पोहरे सभागृहात आयोजित पश्चिम विदर्भ भाजपा वैद्यकीय आघाडीच्या संमेलनात ते ऑनलाईन बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाळासाहेब हरपाळे होते. यावेळी मंचावर भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, खासदार अनुप धोत्रे, तसेच जयंत मसणे, विजय अग्रवाल, योगेश गायकवाड (उपाध्यक्ष) आदींची उपस्थिती होती.

Vote rigging case : मतदार याद्या तपासण्याच्या राज आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सुचना !

“डॉक्टर हे समाजाशी घट्ट नाळ जोडून काम करणारे तज्ञ असतात. त्यांच्या सामाजिक जाणिवेमुळे पक्षविस्ताराला बळ मिळेल. विदर्भातील डॉक्टरांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. तसेच सरकारी योजनांचा प्रचार हे सामाजिक दायित्व म्हणून पार पाडावे,” असे आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले.

“वेगवेगळ्या तज्ञ डॉक्टरांची टीम तयार करून आदिवासी आणि वंचित घटकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचवावी. मतदान जागृतीसोबत पक्षाची विचारधारा रुजवण्यासाठी वैद्यकीय आघाडीने काम करावे. आगामी विजयामध्ये आघाडीचे योगदान निर्णायक ठरेल,” असे प्रतिपादन अनुप धोत्रे यांनी केले.

Devendra fadnavis : फडणवीसांनी राजकारणातील सर्व दोर कापले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. किशोर मालोकार यांनी केले, तर सूत्रसंचालन अॅड. देवाशिष काकड यांनी केले. बैठकीत संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी संघटनेचे महत्त्व स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. बाळासाहेब हरपाळे म्हणाले, “सर्व पॅथीतील डॉक्टरांना एकत्र आणून संघटना बळकट करावी. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली समाजकल्याणाचे कार्य सुरू आहे. त्यात आपले योगदान देणे हे आपले कर्तव्य आहे,” असे आवाहन त्यांनी केले.