Ganesh Utsav : गणेशोत्सव मंडळांच्या स्पर्धेला राजकीय रंग?

Possibility of political interference in the registration process of Ganeshotsav Mandals : धर्मादाय नोंदणीसाठी लगबग, १३८५ मंडळांमध्ये चुरस

Buldhana जिल्ह्यात यंदा एकूण १,३८५ गणेश मंडळे असून, ही संख्या गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे. गणेशोत्सवाच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मंडळांनी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करणे आणि पोलिस व स्थानिक स्वराज्य संस्थेकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. स्थानिक पातळीवर या परवानग्या आणि नोंदणी प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाराष्ट्र सरकारने यंदाच्या गणेशोत्सवाला प्रथमच ‘राज्य महोत्सव’ म्हणून मान्यता देत मोठी घोषणा केली आहे. यानिमित्ताने राज्यभर विविध सांस्कृतिक स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, तसेच प्रमुख मंडळांच्या थेट प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. एकूण १० कोटी रुपयांची बक्षिसे जाहीर करून सरकारने उत्सवाला राजकीय रंग दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Rohit Pawar : रोहित पवारांनी आणले 12 हजार पानांचे ‘बॅगभर’ पुरावे !

या निर्णयामुळे स्थानिक गणेश मंडळे, कलाकार आणि सांस्कृतिक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळणार असले तरी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम मतदारांना आकर्षित करण्यासाठीचा प्रयत्न नाही का? असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.

राज्यभर विविध सांस्कृतिक स्पर्धांसाठी एकूण १० कोटी रुपयांची बक्षिसे देण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार मिळणार असले तरी, या स्पर्धांमध्ये कोणत्या मंडळांना प्राधान्य मिळेल, आणि त्यामागे राजकीय निष्ठेचे गणित असेल का? यावर चर्चा रंगली आहे.

Sanjay shirsat : पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडी आहे !

गणेशोत्सवात ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले’, ‘ऑपरेशन सिंदूर’, ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘स्वदेशी संकल्पना’ यासारखे विषय घेऊन कार्यक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सरकारच्या विचारसरणीशी सुसंगत कार्यक्रमांवर भर असल्याचा विरोधकांचा आरोप आहे.