व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Maratha Andolan : आमची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली तेव्हा तू कुठे होतीस?

Maratha Andolan : आमची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली तेव्हा तू कुठे होतीस?

Manoj Jarange Patils anger on Chitra Wagh : मनोज जरांगे पाटील यांचा चित्रा वाघांवर संताप

Antarwali Sarati : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील राजकारण तापले असताना, आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर जोरदार शब्दांत हल्लाबोल केला आहे. अंतरवली सराटीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देतानाच चित्रा वाघांवर सडकून टीका केली.

मनोज जरांगे म्हणाले की, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल काही बोललोच नाही. पण बोलण्याच्या ओघात जर माझ्या तोंडून काही शब्द गेले असतील, तर ते मी माघारी घेतो. मात्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण द्यावे. पोलिसांनी आमच्या आई- बहीणींना मारलं, त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. तुझी आई तुला प्रिय आहे, तशीच आम्हाला आमची आई प्रिय आहे. तू मुख्यमंत्री आहेस, लाज वाटली पाहिजे. ज्या पोलिसांना शिक्षा व्हायला हवी होती त्यांनाच मोठ्या पदांवर नेमलं.

Mahadev Jankar : उशिरा का होईना, कर्जमाफीवर बोलायला तर लागले!

यावेळी त्यांनी चित्रा वाघांना उद्देशून तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. ती जी बाई बोलली, कोण वाघीण… आमची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, तेव्हा तू कुठे होतीस? आमच्या तीन – चार वर्षांच्या पोरी जखमी झाल्या, तेव्हा तू झोपली होतीस का? आता तुला आठवलं? तू माझ्या नादी लागू नकोस, लागलीस तर तुझं सगळं गबाळ बाहेर काढीन. संध्याकाळपर्यंत तुझी सगळी माहिती माझ्याकडे असेल, असा इशाराच जरांगेंनी दिला.

Vote Theft : मग आम्ही बी टीम कसे?, वंचित बहुजन आघाडीचा सवाल

ते म्हणाले, आमच्या आईवर 307 ची केस लागली, तुझ्यावर तशी केस केली तर चालेल का? तू बाई असशील, तर आमच्याकडेही बाया आहेत. त्यामुळे मराठ्यांच्या वेदना समजून घे, अन्यथा शांत बस.”
मनोज जरांगेंच्या या वक्तव्याने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. रविवारी झालेल्या त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर चित्रा वाघ, प्रसाद लाड यांच्यासह भाजप नेत्यांनी जरांगेंवर टीका केली होती. त्यावरून जरांगेंनी आता थेट पलटवार केला आहे. आता या तीव्र वक्तव्याला चित्रा वाघ काय प्रत्युत्तर देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

____

error: Content is protected !!