Aapala Sarkar : ‘आपले सरकार’ पोर्टल आता अधिक सुलभ होणार !

Provide services on WhatsApp CM Devendra Fadnavis instructions : सेवा व्हॉट्सॲपवर पुरवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Mumbai : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक वेगाने, सुलभतेने आणि एकसंध पद्धतीने मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. राज्य शासनाच्या ‘आपले सरकार’ या पोर्टलवरील सर्व सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनही पुरवल्या जाणार आहेत. तसेच प्रत्येक तालुक्यात “रिंग प्रणाली” उभारून सेवा वितरण कार्यक्षम व गरजेनुसार होईल यावर भर देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “सर्व सेवा योग्य प्रकारे पुरवण्यासाठी तालुकास्तरावर रिंग प्रणाली राबवावी. सुरुवातीस एका तालुक्यातील 10 ते 12 गावांचा समावेश करून सेवा पुरवठा सुरू करावा. या रिंगच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र गट व व्यवस्थापन टीम तयार करण्यात यावी. सेवा वितरणासाठी ‘डिश डिजिटल सेवा हब’चा वापर करावा.”

Sharad Pawar NCP : दोन ठिकाणी मतदार नाव नोंदणी? राष्ट्रवादी शरद पवार गटाची कारवाईची मागणी!

 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नऊ समान प्रकारच्या सेवा एकत्र करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. “सेवा पुरवठ्याच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत पडताळणी व्हावी. अर्ज प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्रांची संख्या लक्षणीयरीत्या कमी करण्याचे नियोजन व्हावे. राज्यातील सर्व जिल्हा परिषद, महानगरपालिका व विद्यापीठांचे डॅशबोर्ड एकसमान असावेत, जेणेकरून नागरिकांना राज्यभर एकसंध अनुभव मिळेल,” असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्य सचिव राजेश कुमार यांनी सेवा वितरणात अपिलाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आणि प्रमाणपत्र वितरणासाठी मल्टी-मॉडेल प्रणाली (ई-मेल, पोर्टल, व्हॉट्सॲप) वापरण्याचे निर्देश दिले. सध्या ‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे 1001 सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असून त्यापैकी 997 सेवा सध्या ऑनलाइन उपलब्ध आहेत. गेल्या 15 दिवसांत या सेवांमध्ये तब्बल 236 सेवांची भर पडली आहे.

Akot File Police Station : काँग्रेसच्या आमदारांविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर

या बैठकीला राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अपर मुख्य सचिव (नियोजन) राजगोपाल देवरा, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटीया आणि महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर उपस्थित होते.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ घेण्यासाठी आता पोर्टलपुरते मर्यादित न राहता, थेट त्यांच्या मोबाईलवरूनच सोयीस्कर सेवा मिळण्याचा मार्ग खुला होणार आहे.

___