Breaking

Siddharth Kharat Sanjay Raimulkar कमाल आहे! एकाच कामाचे दोनवेळा भूमिपूजन

Groundbreaking ceremony for the same work twice : पहिले अनधिकृत, दुसरे अनधिकृत; मेहकर मतदारसंघातील चित्र

Buldhana मौजे राजगड तालुका मेहकर येथे काही दिवसांपूर्वी माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी एका कामाचे भूमिपूजन केले होते. आता त्याच कामाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते झाले. पहिले भूमिपूजन अनधिकृत आणि दुसरे अधिकृत असल्याचा दावा करण्यात आला आहे. पण एकाच कामाचे दोनवेळा भूमिपूजन झाल्यामुळे अधिक आश्चर्य व्यक्त होत आहे.

रायमुलकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह स्वतः जाऊन अनधिकृत पणे उद्घाटन केले होते. मात्र त्या उद्घाटनाला ग्रामस्थांचा प्रचंड विरोध होता. आता आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते रितसर अधिकृतरित्या सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन केले. १ कोटी ६० लक्ष रुपयांच्या पाझर तलावाच्या बांधकामाचे हे भूमिपूजन आहे.

Local Body Election : निम्म्या पंचायत समित्यांवर महिलाराज !

आमदार सिद्धार्थ खरात यांनी विकासकामांचा सपाटा लावला आहे. मतदारसंघात मृद जलसंधारण तसेच जलसंवर्धनाचे काम हाती घेतले आहे. या अंतर्गत तलावांचा जलसाठा वाढविणे ग्रामस्थांना पिण्यासाठी पाण्याची शाश्वत व्यवस्था निर्माण करणे. जिथे पाण्याची टंचाई आहे तेथे पाझर तलाव निर्माण करणे. मतदारसंघात जलवैभव निर्माण करायचे आहे. शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळाले तरच शेतकरी तरू शकतो, असेही आमदार खरात यावेळी म्हणाले.

Nitin Gadkari : गडकरींनी केले शिल्पकारांचे कौतुक !

कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार सिद्धार्थ खरात, प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हा प्रमुख आशिष रहाटे, तालुका प्रमुख निंबाभाऊ पांडव, महिला आघाडी नेत्या जिजाताई राठोड, काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष देवानंद पवार, मेहकर शहर अध्यक्ष किशोर गारोळे युवा तालुकाप्रमुख आकाश घोडे, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रदिप बिल्लोरे, ॲड.संदीप गवई, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ घनवट शिवसेना महिला गाडीच्या नेत्या जिजाताई राठोड राजगड च्या सरपंच रेखा संजय चव्हाण,जानू राठोड, सुभाष जाधव, परसराम जाधव, गणेश जाधव, प्रेम राठोड, प्रवीण चव्हाण, जयसिंग चव्हाण,प्रवीण चव्हाण,संजय आडे, चंद्रभान आडे, चंद्रभान शिंगणे, सुभाष घायवट, किशोर नायगावकर, धनराज राठोड, बळीराम राऊत, सुभाष आडे, दिनकर गवई, गजानन विखुरले, प्रवीण चव्हाण आदी उपस्थित होते.