व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sanjay Khodke Sulbha Khodke : रेल्वे ओव्हरब्रिज बंद; आमदार दाम्पत्य पोहोचले घटनास्थळी

Sanjay Khodke Sulbha Khodke : रेल्वे ओव्हरब्रिज बंद; आमदार दाम्पत्य पोहोचले घटनास्थळी

Railway overbridge closed, alternative routes under consideration : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांवर विचार

Amravati शहरातील रेल्वे ओव्हरब्रिज सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे अमरावतीत मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येवर उपाययोजना करण्यासाठी आमदार सुलभा खोडके आणि आमदार संजय खोडके यांनी गुरुवारी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमुख अधिकाऱ्यांसह आढावा घेऊन तोडगा काढण्यासाठी मंथन करण्यात आले.

रेल्वे पुलाची पाहणी करताना महापालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, तहसीलदार विजय लोखंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रतीक गिरी, उपविभागीय अभियंता श्रीकृष्ण गोमकाळे, शाखा अभियंता एन. प्रकाश रेड्डी, वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त संजय खताळे, पोलिस निरीक्षक ज्योती विल्हेकर, पीआय प्रवीण वांगे तसेच यश खोडके आदी उपस्थित होते.

Harish Pimple : उमा बॅरेज प्रकल्पात तब्बल २७ कोटींचा घोटाळा?, आमदार हरीष पिंपळे यांचा गंभीर आरोप

नवीन रेल्वे ओव्हरब्रिज उभारण्यासाठी किमान दीड ते दोन वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचे आमदारांनी स्पष्ट केले. रेल्वे पुलाच्या लगतच्या भागातील कच्च्या अप्रोच रस्त्यांवर तात्पुरत्या सोयीसुविधा करून हलकी वाहने, दुचाकी, सायकलस्वार आणि पादचाऱ्यांसाठी वाहतूक सुलभ करता येईल, अशा सूचना आमदार सुलभा खोडके यांनी प्रशासनाला दिल्या.

आमदार संजय खोडके यांनी गुगल मॅपच्या साहाय्याने पर्यायी मार्गांचे प्रात्यक्षिक दाखवले. गर्दी टाळण्यासाठी नेहरू मैदानातून तात्पुरता मार्ग तयार करण्याचा प्रस्तावही मांडला. या मार्गामुळे रायली प्लॉट ते जयस्तंभ चौक तसेच बेलपुरा मार्गे राजापेठकडे जाणारी वाहतूक नियंत्रित होईल. याशिवाय रेल्वे स्टेशन-बसस्थानक मार्गाकडून काँग्रेसनगर, रुख्मिणीनगर व हमालपुरा दिशेला जाणाऱ्यांसाठी जिल्हा ग्रंथालयाजवळील रस्त्याचा वापर करण्याचाही पर्याय विचारात घेण्यात आला.

अमरावती रेल्वे स्टेशनजवळ नवीन उड्डाणपुलासाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधी आवश्यक आहे. यासाठी पाठपुरावा सुरू असून लवकरच निधी मिळवून पूल उभारणीसाठी प्रयत्न वेगवान केले जातील, असे आमदार सुलभा खोडके यांनी स्पष्ट केले.

Harish Pimple : उमा बॅरेज प्रकल्पात तब्बल २७ कोटींचा घोटाळा?, आमदार हरीष पिंपळे यांचा गंभीर आरोप

“अमरावती-बडनेरा रेल्वेमार्गावरील पूल क्षतिग्रस्त झाल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. शहरातील कोंडी दूर करण्यासाठी तातडीने पर्यायी मार्गांच्या उपाययोजना केल्या जातील,” असे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सांगितले.

error: Content is protected !!