Kirit Somaiya : खोट्या आरोपांनी अमरावतीची बदनामी; काँग्रेसकडून सोमय्यांना फटकार

Congress accuses BJP leader of defaming Amravati 

Amravati अमरावती जिल्ह्यात रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असून, त्यांनी खोट्या दस्तऐवजांच्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून जन्मदाखले मिळवले, असा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यांच्या या आरोपामुळे जिल्हा प्रशासन आणि महसूल यंत्रणेत खळबळ उडाली होती. मात्र, सोमय्यांच्या या आरोपांवरून जिल्ह्याची नाहक बदनामी झाल्याचा ठपका काँग्रेसने ठेवत मंगळवारी त्यांचा समाचार घेतला.

काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे, माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख आणि ॲड. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाने मंगळवारी दुपारी पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्याची झालेली बदनामी आणि विद्यार्थ्यांची झालेली अडचण याबाबत लक्ष वेधले. प्रतिनिधी मंडळाने सांगितले की, सोमय्यांच्या आरोपांमुळे महसूल यंत्रणेवर दबाव निर्माण झाला आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे जन्मदाखले थांबवण्यात आले. सध्या शैक्षणिक कारणांसाठी विद्यार्थ्यांना दाखल्यांची गरज असताना त्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

Akash Fundkar : कामगारांची ‘मधली सुटी’ आता एक तासाची!

काही प्रकरणांमध्ये खोट्या दस्तऐवजांच्या आधारे जन्म प्रमाणपत्र मिळवण्यात आले असल्याचे समोर आले आहे आणि त्या संदर्भात पोलिस तक्रारीही दाखल झाल्या आहेत. मात्र, या प्रकरणांत कुणी रोहिंग्या किंवा बांगलादेशी असल्याचे आढळून आलेले नाही. चौकशीअंती जिल्ह्यात रोहिंग्या वा बांगलादेशींचा पत्ता लागला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सोमय्यांनी जाणीवपूर्वक जिल्ह्याची बदनामी केली, असा काँग्रेसचा आरोप आहे.

येथून पुढे कोणत्याही अधिकाऱ्यावर दबाव आणणे अथवा यंत्रणेचे मनोबल खच्चीकरण करणारी कृती टाळावी, असे आवाहन काँग्रेसतर्फे करण्यात आले. यावेळी माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, महानगराध्यक्ष बबलू शेखावत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Crime in Amravati : किती हे भयंकर? वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मायलेकाचा खून

काँग्रेसने यावेळी विद्यार्थ्यांच्या अडवलेल्या दाखल्यांची तत्काळ पूर्तता करण्याची मागणी केली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्र पाठवण्यात आले आहे.