Intrusion into parliament Five dead, many injured in firing : संसद भवनात घुसखोरी; गोळीबारात पाच मृत्यू, अनेक जखमी
Kathmandu : नेपाळमध्ये सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घातलेल्या बंदीविरोधात तरुणांचा संघर्ष उग्र झाला आहे. काठमांडूच्या रस्त्यांवर जनरेशन-झेड पिढीने जोरदार निदर्शने केली. आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करताना संसद भवनातही घुसखोरी केली. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता आंदोलन अधिकच चिघळले. संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने पोलिसांनी लाठीचार्ज, अश्रुधूराचे गोळे, पाण्याचा मारा आणि अखेरीस गोळीबार केला. या गोळीबारात पाच आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत.
न्यू बानेश्वर परिसरात झालेल्या चकमकीदरम्यान गोळी लागलेल्या आंदोलकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती द हिमालयन टाइम्सने दिली आहे. या घटनेत जखमी झालेल्यांची अचूक संख्या अजून स्पष्ट झालेली नाही. जखमींना एव्हरेस्ट हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटल आणि इतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. ‘हामी नेपाळ’ या संघटनेने आंदोलकांना प्राथमिक उपचार देण्यासाठी मैतीघर येथे वैद्यकीय शिबीर उभारले आहे.
दमक जिल्ह्यातील परिस्थितीही तणावपूर्ण झाली. आंदोलकांनी नगरपालिका कार्यालयावर मोर्चा काढून पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचा पुतळा जाळला. त्यांनी कार्यालयाचे दरवाजे तोडण्याचा प्रयत्न केला. वाढता तणाव लक्षात घेऊन सैन्याला मोर्चावर उतरवण्यात आले आहे.
सोमवारी सकाळपासून काठमांडूमधील मैतीघर येथे मोठ्या प्रमाणावर लोक जमले होते. अलीकडच्या काळात ‘नेपो किड’ आणि ‘नेपो बेबीज’ हे हॅशटॅग सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड होत होते. सरकारने अपंजीकृत प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातल्यानंतर या आंदोलनाला अधिक वेग आला. काठमांडू जिल्हा प्रशासन कार्यालयाच्या माहितीनुसार, ‘हामी नेपाळ’ या संघटनेने या आंदोलनाचे आयोजन केले होते आणि त्यासाठी पूर्वपरवानगी घेण्यात आली होती.
Bharat Vishwaguru : भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी गुरुत्व दाखवावे लागेल !
संघटनेचे अध्यक्ष सुधन गुरुंग यांनी सांगितले की, हे आंदोलन सरकारच्या कारभाराविरोधात आणि भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ आहे. देशभरात अशाच स्वरूपाचे आंदोलन होत असून विद्यार्थ्यांनाही गणवेश आणि पुस्तके घेऊन यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सरकारने दि