Fund for the Rajkamal Chowk railway bridge : राजकमल चौकातील रेल्वे पुलाच्या निर्मितीसाठी मिळणार निधी
Amravati शहराच्या मध्यवर्ती आणि वर्दळीच्या राजकमल चौकातील रेल्वे ओव्हरब्रीजला तब्बल ५२ वर्षांचा कालावधी उलटला आहे. पूल धोकादायक झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तो २७ ऑगस्ट २०२५ पासून वाहतूक व पादचाऱ्यांसाठी बंद केला आहे. या पुलाच्या नव्या बांधकामासाठी ३०० कोटी रुपयांची आवश्यकता असून, हा निधी केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत सेतुबंधन योजनेतून उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार बळवंत वानखडे यांना दिले.
अमरावती रेल्वे ओव्हरब्रीजचे स्ट्रक्चरल ऑडिट सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पथकाने केले. या अहवालात पूल पूर्णपणे जीर्ण झाल्याचे स्पष्ट झाल्याने तो कोसळण्याच्या धोक्यामुळे बंद करण्यात आला. त्यामुळे शहरातील प्रमुख मार्ग बंद झाल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असून, नागरिकांना हाल सहन करावे लागत आहेत.
Balen Shah : नेपाळमध्ये सत्तांतर; रॅपर बालेन शाह नवे पंतप्रधान !
या पार्श्वभूमीवर खासदार बळवंत वानखडे यांनी ९ सप्टेंबर रोजी संसद भवन, नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यांनी अमरावतीतील वाहतूककोंडीची तीव्रता, वाहतूकदारांचे हाल आणि नागरिकांचे प्रश्न मांडत पुलाचे तातडीने बांधकाम सुरू करण्याची मागणी केली. यासोबतच ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची लेखी मागणीही केली.
Chandrashekhar Bawankule : ..तर रोहित पवारांनी राजकीय सन्यास घ्यावा !
गडकरी यांनी हा निधी सेतुबंधन योजनेतून उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन दिले. या वेळी खासदार कल्याण काळे, खासदार डॉ. शिवाजी काळगे आदी मान्यवर उपस्थित होते.