Vishwa Hindu Parishad : धर्मांतराच्या प्रयत्नाने तणाव, पोलिसांची चौकशी सुरू

Tension due to attempted religious conversion : विश्व हिंदू परिषद, बजरंग दलची कारवाईची मागणी

Akola पातूर तालुक्यातील अंधारसांगवी गावात धर्मांतराच्या प्रयत्नामुळे तणाव निर्माण झाला. बाहेरगावाहून आलेल्या सात जणांनी आदिवासी समाजातील काही लोकांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ संतप्त झाले आणि त्यांनी सोनाजी शिंदे यांच्या घरी धाव घेतली.
गावकऱ्यांनी बाहेरगावच्या लोकांना प्रश्न विचारले, यादरम्यान शाब्दिक वाद झाले. वाढता जमाव पाहून चान्नी पोलिस ठाण्याचे ठाणेदार रवींद्र लांडे पथकासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असून, अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.

ST announcement : एसटी महामंडळाची घोषणा, ७५ बसस्थानकांवर मोफत वाचनालय

बाळापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन पडघन यांनीही घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या पोलिसांकडून नाव, गाव, ओळखपत्र पडताळणी व बयान नोंदविण्याचे काम सुरू आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ZP Presidents Reservation : राज्यातील 34 जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर !

 

घटनेनंतर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते चान्नी पोलिस ठाण्यात गेले. बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात आहे, असे चान्नी पोलिस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र लांडे यांनी सांगितले.