Sharad Pawar : शरद पवार म्हणजे कारस्थानाचा कारखाना !

File a case of sedition, Padalkars attack : देशद्रोहाचा गुन्हा दाखल कर, पडळकरांचा हल्ला

Pune : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यावर घणाघात केला आहे. “शरद पवार हे कारस्थानाचा कारखाना आहेत. त्यांनी निवडणूक आयोगासारख्या विश्वासार्ह संस्थेवर शंका निर्माण केली, त्यामुळे त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी केली.

मारकडवाडी प्रकरणाचा संदर्भ देत पडळकर म्हणाले, “निवडणूक हा देशाचा गाभा आहे. त्यावर षडयंत्र करून शंका घेण्यास भाग पाडणे म्हणजे देशद्रोह आहे. निवडणूक आयोगाची बदनामी केल्याबद्दल शरद पवारांवर गुन्हा दाखल व्हायलाच हवा.”

Harshawardhan Sapkal : देवेंद्र फडणवीस यांनी पापाची कबुली द्यावी !

पडळकरांनी पवारांना “आधुनिक काळातील नारदमुनी” म्हणत टोला लगावला. ते म्हणाले, “एकीकडे मंडल यात्रा, दुसरीकडे नातू आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण द्या असं म्हणतात. ही दुतोंडी भूमिका आहे. सहकार क्षेत्रात त्यांचं प्राबल्य आहे कारण तिथे चिठ्ठ्या गिळता-पळवता येतात. पण जर सहकार क्षेत्रात ईव्हीएम आलं तर त्यांचं वर्चस्व संपेल.”

शरद पवारांच्या अलीकडील विधानाचा उल्लेख करत पडळकर म्हणाले, “पवारांनी सांगितलं की, विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन लोक आले होते आणि १६० आमदार जिंकवून आणण्याची ऑफर दिली होती. त्यांनी लगेच गृहमंत्र्यांना कळवायला हवं होतं. पण त्यांनी राहुल गांधींना सांगितलं. याचा अर्थ त्यांनी षडयंत्र केलं. निवडणुकीनंतर आठ महिन्यांनी ही गोष्ट उघड करणं म्हणजे संशयास्पद आहे. पन्नास वर्षांपूर्वीचे लोक पवारांना आठवतात, पण आठ महिन्यांपूर्वी भेटलेले लोक आठवत नाहीत, असं कसं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यावेळी पडळकरांनी राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. “जयंत पाटलांनी आत्महत्या केली तर मला आरोपी ठरवा,” अशा वक्तव्याने त्यांनी स्वतःवर होणाऱ्या आरोपांना उत्तर दिलं.

Maharashtra politics : उद्धव ठाकरे नव्हे, फडणवीसांचा मित्रपक्षांनाच इशारा !

गोपीचंद पडळकर हे शरद पवारांवर नेहमीच टोकाचे वक्तव्य करणारे नेते म्हणून ओळखले जातात. मात्र, या वेळी त्यांनी थेट “देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा” अशी मागणी करून राजकीय वातावरण चांगलंच तापवलं आहे. भाजपाच्या आक्रमक भूमिकेमुळे राष्ट्रवादी शरद पवार गटावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न असल्याचं निरीक्षकांचे मत आहे.