Reservation controversy : जितका मराठ्यांना त्रास द्याल तितकं खोलात घुसू !

Manoj Jaranges warning to Bhujbal again : मनोज जरांगे यांचा भुजबळांना पुन्हा इशारा

Beed : ओबीसी आरक्षण बचावासाठी मंत्री छगन भुजबळ आक्रमक झालेले असतानाच मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना थेट इशारा दिला आहे. “भुजबळांना काय करायचं ते करू द्या. पण जितका त्रास मराठ्यांना दिला जाईल, तितके मराठे खोलात घुसतील,” असा इशारा जरांगे यांनी दिला.

सध्या छगन भुजबळ ठिकठिकाणी सभांमधून मराठा आरक्षणाविरोधात भूमिका मांडत आहेत. “मराठा समाजाला दिलेलं जीआर हा ओबीसी आरक्षणाला धक्का आहे” असा त्यांचा दावा आहे. न्यायालयीन लढाईसोबत रस्त्यावरही लढा उभारण्याची तयारी असल्याचं त्यांनी नागपूरमधील चिंतन शिबिरात स्पष्ट केले. यावर प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले, “मराठ्यांनी कधी कुणाच्या आरक्षणाला विरोध केला नाही. पण मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला तर मराठेही त्याला उत्तर देतील.”

Bachu Kadu : बच्चू कडूंचा धमकीवजा इशारा : “आता थेट कलेक्टरलाच तोडू”

यावेळी जरांगे यांनी मराठा समाजाला विरोध करणाऱ्यांना थेट इशारा देत, “मराठ्यांना जितका त्रास दिला, तितकी त्यांची ताकद उघड होईल,” असे ठणकावले.

अलीकडेच मनोज जरांगे यांनी “मराठा आरक्षणासाठी दिल्लीकडे कूच” करण्याचा नारा दिला होता. हैदराबाद आणि सातारा गॅझेटनुसार कुणबी नोंद असलेल्या मराठ्यांची नोंदणी करण्यास सरकारने सुरुवात केली असून, काहींना प्रमाणपत्रेही देण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र वितरण झाले. दुसरीकडे, हैदराबाद गॅझेटला विरोध करणाऱ्या काही याचिका न्यायालयाने फेटाळल्या.

या घडामोडींमुळे मराठा आणि ओबीसी समाजात तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काही मंडळी जाणीवपूर्वक मतभेद निर्माण करत असल्याचा आरोपही केला जातो. सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी गावा-गावातून एकीची हाक दिली जाण्याची गरज असल्याचे ज्येष्ठांचे मत आहे.

Ajit Pawar : ..आणि म्हणून मी सहा वेळा उपमुख्यमंत्री झालो !

मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण पुन्हा पेटण्याची चिन्हे असून, जरांगे आणि भुजबळ आमनेसामने येत असल्याने या संघर्षाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.