Don’t be limited for food preparation only : ‘संकल्प स्वच्छ आहार’ उपक्रमाचे उद्घाटन
Buldhana पर्यटकांना स्थानिक खाद्यपदार्थांचे मोठे आकर्षण असते, त्यामुळे विक्रेत्यांनी स्वच्छता व सुरक्षिततेकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. शेगांव कचोरीसारख्या प्रसिद्ध पदार्थांचे उत्तम पॅकेजिंग, ब्रँडिंग करून त्यांचा व्यवसाय मोठा करावा, असे आवाहन केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण पश्चिम क्षेत्रामार्फत सहकार विद्या मंदिर शाळेच्या सभागृहात ‘संकल्प स्वच्छ आहार’ उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले.
Workers get diarrhea due to contaminated water : दूषित पाण्यामुळे शंभर कामगारांना अतिसाराची लागण
प्रशिक्षक डॉ. रामेश्वर जाजू व प्रियंका सूर्यवंशी यांनी वैयक्तिक स्वच्छता, सुरक्षित अन्न हाताळणी, अन्न भेसळ आणि अन्न सुरक्षा व स्वच्छता मानके याविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रिती चौधरी यांनी केले, तर सूत्रसंचालन अजय खैरनार यांनी केले. या कार्यक्रमात दोन हजारापेक्षा जास्त बचत गटाच्या महिला व रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणारे विक्रेते सहभागी झाले होते.
रस्त्यावरील खाद्यपदार्थ भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे एक जिवंत उदाहरण आहे. प्रत्येक वर्गातील व्यक्ती आवडीने खातात. खाद्यप्रेमी अन्न सुरक्षा, स्वच्छता व पौष्टिक पदार्थांना प्राधान्य देत आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अन्न सुरक्षा व स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण पश्चिम क्षेत्राच्या संचालक प्रिती चौधरी, दिल्ली मुख्यालयाचे संचालक डॉ. रविंद्र सिंग, आयुष विभागाचे प्रा. डॉ. योगेश शिंदे, सहायक संचालक ज्योती हरणे, स. संचालक अजय खैरनार, निलेश धंदाळे, शुभांगी निकम आदी उपस्थित होते.
स्वनिधी योजना व आयुष आहार
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी स्वनिधी योजनेच्या माध्यमातून अल्प दरात कर्ज उपलब्ध करून देण्याची माहिती दिली. त्यांनी खाद्यपदार्थ विक्रेत्यांना आयुष आहाराला प्राधान्य देऊन जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. आयुष आहारामुळे विविध आजारांपासून बचाव होत असून शारीरिक, मानसिक स्वास्थासाठी आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.