Sports Minister claims victory in the election was due to Amol Mitkari : मिटकरींमुळेच विधानसभा जिंकलो, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचे विधान
Akot कृषीमंत्री असताना माणिकराव कोकाटे यांच्यावर शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे खातेबदलाची नामुष्की आली होती. त्यानंतर त्यांचे खातेबदल करण्यात आले. कोकाटेंनी एका कार्यक्रमात बोलताना आमदार अमोल मिटकर आपले गुरू असल्याचे विधान केले आहे. त्याचवेळी बोलणाऱ्यालाच लोक नावं ठेवतात, असंही ते म्हणाले आहेत.
विधानसभा निवडणुकीत अमोल मिटकरी यांनी आपल्या मतदारसंघात सभा घेतल्यामुळेच आपण तीन हजार मतांनी का होईना, परंतु विजयी झालो, अशी कबुली कोकाटे यांनी दिली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन महत्त्वाची नावे म्हणजे मंत्री माणिकराव कोकाटे आणि आमदार अमोल मिटकरी. दोघेही त्यांच्या बेधडक आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात. हे दोन्ही नेते अकोला जिल्ह्यातील अकोट येथे झालेल्या पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात एका व्यासपीठावर आले. झुनझूनवाला सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात पक्ष कार्यकर्ता सन्मान व प्रवेश सोहळा पार पडला.
Orphans policy : महाराष्ट्रातील १८ वर्षांवरील अनाथ युवकांसाठी धोरण ठरवा
या वेळी बोलताना कोकाटे म्हणाले, “मिटकरी माझे गुरु आहेत. त्यांच्या पाठबळामुळेच मी निवडणुकीत काठावर विजय मिळवला. बोलणाऱ्यांनाच लोक नाव ठेवतात, पण मी आज आणि उद्याही मिटकरी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे.”
माणिकराव कोकाटे हे गेली पाच वेळा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मतदारसंघातून वेगवेगळ्या पक्षांच्या तिकीटावर निवडून आले आहेत. तर अमोल मिटकरी हे पहिल्यांदाच विधान परिषदेवर आमदार झाले आहेत. अशा वेळी कोकाटे यांनी मिटकरींना ‘गुरु’ म्हटल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याच कार्यक्रमात कोकाटे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना जास्तीत जास्त संख्येने निवडून देण्याचे आवाहन केले. “अजित पवारांचे हात बळकट करा,” असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
Controversial statement : जास्त चभरेपणा करू नका, मी तुमच्या पक्षाबद्दल बोलतोय…
शिंदे गटाचे माजी आमदार सदा सरवणकर यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना कोकाटे म्हणाले की, “सरकारकडून सर्वच आमदारांना समान निधी दिला जातो. मात्र शहरानुसार निधीचे हेड बदलतात, त्यामुळे रकमेतील फरक दिसतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.








