Negligence of the administration during the Yatra festival will not be tolerated : आमदारांचा इशारा, भाविकांच्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर राहण्याचे आदेश
Deulgaoraja साडेतीनशे वर्षांची परंपरा लाभलेला श्री बालाजी महाराजांचा यात्रा महोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून, भाविकांच्या सुविधा व सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत. महोत्सव काळात भक्तांना भेडसावणाऱ्या समस्या तातडीने सोडवल्या नाहीत, तर कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा आमदार मनोज कायंदे यांनी दिला.
यात्रा समितीची बैठक स्थानिक नगरपालिकेच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आमदार कायंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सभेत भाविकांनी वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या समस्या मांडल्या. “दरवर्षी केवळ औपचारिक प्रोसिडिंग तयार करून समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते, मात्र यंदा असे होणार नाही. प्रत्येक तक्रारीचे प्रशासनाने समाधान करणे बंधनकारक आहे,” असे कायंदे यांनी स्पष्ट केले.
Banjara Reservation : ‘एक गोर, सव्वा लाखेर जोर’, बंजारा समाजाचा नारा
यात्रेतील व्यापाऱ्यांसाठी जागावाटप समितीत गैरव्यवहार होत असल्याचा मुद्दा देखील उपस्थित झाला. यावर उपविभागीय अधिकारी खडसे यांनी समितीचे पुनर्गठन करण्याचे आश्वासन दिले.
OBC Reservation : आमरण उपोषण सुरूच राहणार, पाठिंब्याच्या पत्रांचा ओघ
सभेत गाजलेले प्रमुख मुद्दे
यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कंट्रोल रूम व मार्गदर्शन केंद्र स्थापन करावे.
यात्रेत मांसाहार, जुगार व इतर अवैध धंद्यांवर कडक बंदी घालावी.
व्यापाऱ्यांना एलपीजी सिलेंडर पुरवठा, वीज व पाणीपुरवठा सुनिश्चित करावा.
भाविकांसाठी पार्किंग, आरोग्य सेवा, शौचालये व मुत्रीघरांची व्यवस्था करावी.
गावातील खड्डे बुजवणे, बंद स्ट्रीटलाईट सुरू करणे, लोडशेडिंग थांबवणे.
महोत्सव काळात अतिरिक्त एसटी बसेस उपलब्ध करून द्याव्यात.
लळीत उत्सवाच्या दिवशी दारूची दुकाने बंद ठेवावीत.
तमाशा व इतर लोककला मंडळांना परवानगी द्यावी.
अतिक्रमण हटवणे व सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी.