Match Controversy : पाकड्यांनी भारतीय पर्यटकांना असं मारलं हेच त्याच्या कृतीतून…,

Sanjay Raut gets angry over Pakistani batsman’s ‘firing celebration : पाकिस्तानी फलंदाजाच्या ‘फायरिंग सेलिब्रेशन’वर संजय राऊत संतापले

Mumbai : आशिया चषकाच्या सुपर-४ फेरीतील भारत–पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानचा खेळाडू साहिबजादा फरहान याने अर्धशतक झळकावताच केलेल्या ‘गन फायरिंग सेलिब्रेशन’ मुळे नवा वाद निर्माण झाला आहे. मैदानावरच बॅट एके – 47 सारखी धरून गोळीबार करण्याची अ‍ॅक्शन केली, आणि यावर भारतात संताप व्यक्त होत आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या कृतीवरून तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “ सामन्यात साहिबजादा फरहान याचं अर्धशतक होताच त्याने मैदानात एके – 47 प्रमाणे बॅट धरून गोळीबाराची एक्शन केली. पाकड्यांनी निरपराध भारतीय पर्यटकांना असं मारलं, हेच त्याने त्याच्या कृतीतून दाखवलं. हा प्रकार बीसीसीआय आणि मोदी सरकारसाठी लज्जास्पद आहे. भारताच्या लष्कराचा आणि पुलवामा – पहेलगाममध्ये हुतात्मा झालेल्या नागरिकांचा हा अपमान आहे.”

Navratri 2025 : उदो बोला उदो… उदो बोला अंबाबाई माऊलीचा…

राऊत म्हणाले, “हे सर्व पाहूनही बीसीसीआय गप्प आहे, मोदी सरकार मौन आहे. अमित शाह यांचे सुपुत्र आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांनी अशा प्रकाराकडे दुर्लक्ष करणे अत्यंत निंदनीय आहे. पाकिस्तानकडून अशा कृती होत असताना त्यांना खेळण्याची परवानगी देणे म्हणजे देशाचा अपमान आहे.”

Local body election : अजित पवारांची स्वबळाची तयारी !

दरम्यान, दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला असला तरी साहिबजादा फरहानच्या वादग्रस्त सेलिब्रेशनमुळे सामन्यानंतरच्या चर्चांमध्ये राजकारणाचे वारे अधिकच जोरात वाहू लागले आहेत.