District Central Cooperative Bank : भेटवस्तू वाटपावरून संचालक मंडळात आरोप–प्रत्यारोप

allegations in the board of directors over gift distribution : खोट्या इतिवृत्तावर विरोधकांचा रोष; सत्ताधाऱ्यांवर अनियमिततेचे आरोप

Amravati जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची सभा बँकेच्या सभागृहात झाली. या सभेच्या प्रारंभीच बबलू देशमुख गटातील ११ संचालकांनी प्रशासनाविरोधात गंभीर आक्षेप लेखी स्वरूपात नोंदविले. विरोधी संचालकांनी आपल्या पत्रात मागील दोन वार्षिक आमसभेत सभासदांना भेटवस्तू वाटपात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे.

या भेटवस्तू वाटपाची तरतूदच नसतानाही संचालक मंडळाच्या मान्यतेशिवाय महागड्या वस्तू खरेदी करण्यात आल्या आणि काही सभासदांना त्या वाटप करण्यात आल्या, तर अनेकांना भेटवस्तू मिळाल्याच नसल्याचे नमूद केले आहे. तसेच, वार्षिक सभेची नोटीस वृत्तपत्रात प्रकाशित झाली असली तरी विषय, वेळ आणि स्थळ हे कायदेशीर प्रक्रियेनुसार संचालक मंडळाच्या मान्यतेशिवाय निश्चित केल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

Ladki bahan Yojana : लाडकी बहीण योजनेत तब्बल ४९०० कोटींचा भ्रष्टाचार?

इतिवृत्त वेळेत तयार न करणे, सभेत न झालेल्या विषयांचे खोटे नोंदविणे, सर्व संचालकांना नोटिसा न पाठवणे, कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने बैठका घेणे, तसेच या बैठकींमुळे अनाठायी प्रवास भत्ता खर्च करणे आदी मुद्द्यांवरही विरोधी गटाने प्रशासनावर थेट आक्षेप घेतले. हा खर्च संबंधित पदाधिकारी व अधिकाऱ्यांकडून वसूल करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Heavy Rain : शेतकरी उद्ध्वस्त, “अशी अतिवृष्टी याआधी पाहिली नाही!”

सध्या जिल्ह्यातील पिकांची स्थिती अतिशय बिकट असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा ठराव बँकेने घ्यावा, अशी मागणी विरोधी गटातील संचालक बबलू देशमुख, वीरेंद्र जगताप, खासदार बळवंत वानखडे, सुधाकर भारसाकळे, सुरेश साबळे, हरिभाऊ मोहोड, दयाराम काळे, एस.बी. गावंडे, पी.बी. अलोणे, रवींद्र गायगोले आणि सौ. एम.एस. मार्डीकर यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.