Ashwini Vaishnaw : स्वदेशीचा मंत्र! परकीय सॉफ्टवेअरऐवजी भारतीय ‘ झोहो’ !

Direct use also in the IT Ministry of the Central Government : केंद्र सरकारच्या आयटी मंत्रालयातही प्रत्यक्ष वापर

New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या “स्वदेशीचा मंत्र” आता केंद्र सरकारच्या आयटी मंत्रालयातही प्रत्यक्ष उतरू लागला आहे. केंद्रीय आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या दैनंदिन कामकाजासाठी परकीय सॉफ्टवेअरऐवजी भारतीय कंपनी झोहो (Zoho) चा स्वीकार करण्याची घोषणा केली आहे.

सोशल मीडियावर माहिती देताना वैष्णव यांनी सांगितले की, पुढे ते दस्तऐवज, स्प्रेडशीट्स आणि सादरीकरणासाठी झोहोचे ऑनलाइन ॲप्स वापरणार आहेत. “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशीच्या आवाहनाला प्रतिसाद द्या, स्थानिक तंत्रज्ञान वापरा,” असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले. झोहो ही चेन्नईस्थित कंपनी असून ती ई-मेल, डॉक्स, प्रेझेंटेशन, स्प्रेडशीट यांसारख्या सेवा पुरवते.

Farmers incrisis : शेतकरी संकटात! मदत कधी ? कर्जमाफी कधी?

 

अमेरिकेने भारतावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी नुकतेच उत्सवी काळात “स्वदेशी वस्तू खरेदी करा” असे आवाहन केले होते. त्याचसोबत जीएसटी दरकपात, कर सुधारणा आणि बचत महोत्सव यांसारख्या उपक्रमांमुळे लोकांच्या खरेदी क्षमतेत वाढ करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

Electricity on highway : देशात पहिल्यांदाच हायवेवर वीज निर्मिती

 

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या निर्णयामुळे परकीय तंत्रज्ञानावर अवलंबित्व कमी होईल, डेटा गोपनीयता आणि सुरक्षा सुधारेल, स्थानिक सॉफ्टवेअर उद्योगाला प्रोत्साहन मिळेल. मोदींनी स्पष्ट केलं आहे की “स्वदेशी” म्हणजे केवळ वस्तूंची खरेदी नव्हे, तर सेवा आणि डिजिटल प्लॅटफॉर्ममध्येही स्थानिक पर्याय स्वीकारणे.

______