Sudhir Mungantiwar : धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार !

Discussion with CM Devendra Fadnavis on Starting Paddy Procurement Centers : ‘पोखरा’ आणि ‘किसान समृद्धी’त सर्वाधिक प्रस्ताव बल्लारपुरातून जावे

Chandrapur : राज्याची सध्याची स्थिती पाहता शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पन्न वाढवणे या दोन महत्वाच्या उद्दिष्टांवर विशेष रुपाने काम केले जात आहे. शेतकऱ्यांना धानाचा बोनस मिळावा, यासाठी विधानसभेत आवाज उठवला. सुमारे ८० ते ९० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात धानाचा बोनस जमा झाला आहे. धान चुकाऱ्याचे पैसेही दिले गेले. आता धान खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

चंद्रपुरातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय येथे कृषी पंप वीज जोडणीच्या प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन उपाययोजना करण्यासाठी आज (२७ सप्टेंबर) बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार मुनगंटीवार बोलत होते. ते म्हणाले, मागील काळात मी मंत्री असताना चंद्रपूरमध्ये ८० कोटी रुपये खर्च करून शेतकऱ्यांसाठी कृषी हाट सुरू करण्याचा उपक्रम राबवला. हे कृषी हाट आता तयार करण्यात येत आहेत. या हाटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवता येणार आहे.

Sudhir Mungantiwar : पोंभूर्णा होणार राज्यातील आदर्श तालुका !

 

मुल येथे कृषी महाविद्यालय उभारण्यात येत आहे. पंजाब नॅशनल बॅंकेच्या माध्यमातून अजयपूर येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्र स्थापन केले जात आहे. बल्लारपूर मतदारसंघातील काही गावे ‘पोखरा’ तर काही गावे ‘किसान समृद्धी’ याोजनेत समाविष्ट आहेत. शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना, यांत्रिकीकरणाच्या योजना आणि जमिनीची सुपीकता वाढवणाऱ्या योजनांबाबत मतदारसंघाच्या प्रत्येक गावात जनजागृती करावी. मतदारसंघ कृषी क्षेत्रात प्रथम क्रमांकावर राहावा, यासाठी सर्वांनी सतत कार्यरत राहिले पाहिजे, असे आमदार मुनगंटीवार म्हणाले.

Sudhir Mungantiwar : बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे टपाल तिकिट झाले, आता गौरवग्रंथ काढण्यासाठी प्रयत्न करणार !

 

महाराष्ट्रातून ‘पोखरा’ आणि ‘किसान समृद्धी’ याोजनेत सर्वाधिक प्रस्ताव बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून गेले पाहिजे, याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी. पालकमंत्री असताना ५००३ किलोमीटरच्या शेतकऱ्यांच्या पाणंद रस्त्यांचा निर्णय घेतला. मतदारसंघातील प्रत्येक गावातील पाणंद रस्ते याच ५००३ किलोमीटरच्या आराखड्यात समाविष्ट आहेत. माविमच्या माध्यमातून महिला बचत गटांचे यांत्रिकीकरण करा आणि पुरूष बचत गटही स्थापन करण्यात यावे, अशी सुचना आमदार मुनगंटीवार यांनी केली.

Sudhir Mungantiwar : खड्डे बुजवा, नाहीतर गाठ माझ्याशी !

 

शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी ठोस पावले उचलण्यासाठी कटीबद्ध असल्याचा ठाम निर्धार आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. शेती हा केवळ व्यवसाय नसून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारे साधन आहे, असे सांगत शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम तत्पर राहण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आजच्या बैठकीला भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष बंडू गौरकार, महामंत्री भालचंद्र वडस्कर, महावितरण तज्ञ माधव जीवतोडे, युवा किसान मोर्चाचे अध्यक्ष पलींद्र सातपुते, अनिल मोरे, प्रभाकर ताजणे, विजय गुरनुले, रवींद्र चहारे आदींची उपस्थिती होती.