No fulltime Tehsildar in Motalā, citizens are facing difficulties : पूर्णवेळ अधिकारी नेमा, भाजपची महसूल मंत्र्याकडे मागणी
Motala तालुक्यातील शेतकरी व सामान्य नागरिकांच्या अडचणी लक्षात घेता मोताळा तहसील कार्यालयात कायमस्वरूपी तहसीलदार नेमण्याची मागणी तालुका भाजपाने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.
मोताळ्याचे विद्यमान तहसीलदार हेमंत पाटील हे लाचलुचपत विभागाच्या कारवाईत अडकल्यानंतर गेल्या दहा-बारा दिवसांपासून येथील प्रभार नांदुरा तहसीलदारांकडे आहे. मात्र ते पूर्णवेळ मोताळा येथे हजर राहू शकत नसल्याने विद्यार्थ्यांच्या दाखल्यांपासून शेतकऱ्यांच्या पीककर्ज प्रस्तावांपर्यंतची अनेक कामे प्रलंबित राहत आहेत. परिणामी, तालुक्यातील शेतकरी व विद्यार्थी वर्गाला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
Uddhav Balasaheb Thackeray : शेतकरी हवालदील, ठाकरे गटाचे तहसीलपुढे धरणे आंदोलन
दरम्यान, २१ व २२ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे खामखेड, गुळभेली, उबाडखेड, सोनबरड, नाईकनगर, नळकुंड यांसह अनेक गावांतील मका, कपाशी, सोयाबीन, तूर व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. घरांची पडझड होऊन नागरिक उघड्यावर पडले आहेत. पंचनाम्याची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू असून शेतकऱ्यांचा रोष वाढला आहे.
Vidarbha Farmers : पीक कर्जमाफीचे आश्वासन ‘थकीत’, शेतकऱ्यांवर हजारो कोटींचे ओझे!
या पार्श्वभूमीवर तालुका भाजपाध्यक्ष सचिन शेळके यांनी मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे पूर्ण करणे, सरसकट नुकसानभरपाई जाहीर करणे,तसेच मोताळ्यास कायमस्वरूपी तहसीलदार नेमणे- या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. यावेळी उपतालुकाध्यक्ष श्रीकांत घाटे, सतिश भाकरे पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.








