व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Deekshabhoomi : या ऐतिहासिक स्थळावरून समानता, न्यायाची प्रेरणा मिळते !

Deekshabhoomi : या ऐतिहासिक स्थळावरून समानता, न्यायाची प्रेरणा मिळते !

Former President Ram Nath Kovind at Deekshabhoomi : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे दीक्षाभूमीवर वक्तव्य

Nagpur : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी महोत्सवाच्या प्रमुख अतिथी म्हणून नागपूरला आलेले माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संघाच्या मंचावर जाण्यापूर्वी बुधवारी दीक्षाभूमीला भेट दिली. भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांनी अभिवादन केले.

कोविंद म्हणाले, “लाखो अनुयायांसोबत या पवित्र स्थळावर भेट देणे हे माझ्यासाठी सौभाग्याचे आहे. या ऐतिहासिक दीक्षाभूमीवरून समानता, दयाळूपणा आणि न्यायाची प्रेरणा मिळते.” यावेळी दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी त्यांचे स्वागत करून स्मृतीचिन्ह प्रदान केले.

नागपूरमध्ये विजयादशमीच्या दिवशी संघाचा दसरा उत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा भव्य सोहळा एकत्र साजरा होतो. लाखो अनुयायांच्या उपस्थितीत कोविंद यांची ही भेट विशेष ठरली आहे.

Padalkar Vs Patil : तर जयंत पाटील जुनियर,आम्हाला हलक्यात घेऊ नका !

यापूर्वी कोविंद यांनी संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या निवासस्थानालाही भेट दिली. त्यांनी तेथील अभ्यागत वहीत आपली भावना व्यक्त केली तसेच ऐतिहासिक वास्तूचे महत्त्व जाणून घेतले. हेडगेवारांच्या निवासातील झोपाळ्यावर बसून त्यांनी आनंदही घेतला.

RSS Utsav : आपण एकटे जगू शकत नाही, पण निर्भरता नाईलाज होऊ नये !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे रामनाथ कोविंद हे पहिलेच माजी राष्ट्रपती आहेत.

error: Content is protected !!