‘Vanchit’ leader criticizes BJP-RSS for betraying OBCs : अॅड. प्रकाश आंबेडकर यांची टीका, धम्मदीक्षा मेळाव्यातून साधला निशाणा
Akola “ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्याच भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ओबीसींचा सर्वात मोठा विश्वासघात केला. एवढाच जर विचार ओबीसींनी केला, तरी त्यांचे आरक्षण वाचू शकेल,” असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा, अकोला जिल्ह्याच्यावतीने अकोला क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित धम्म मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याला भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी. जे. वानखडे अध्यक्षस्थानी होते. प्रा. अंजली आंबेडकर, युवा नेते सुजात आंबेडकर, माजी आमदार अॅड. नातिकोद्दीन खतीब, अशोक सोनोने, अरुंधती शिरसाट, यू. जी. बोराडे, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, निलेश विश्वकर्मा, राजेंद्र पातोडे, उत्कर्षा रुपवते, प्रमोद देंडवे, बालमुकुंद भिरड, आम्रपाली खंडारे, श्रीकांत घोगरे, मिलन मेंढे, ज्ञानेश्वर सुलताने आदी मान्यवर उपस्थित होते.
Cyclone Shakti : ‘शक्ती’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर मोठा धोका!
आंबेडकर म्हणाले, “ओबीसींचे केवळ राजकीयच नाही तर शैक्षणिक आरक्षणही धोक्यात आहे. समाजव्यवस्थेत ज्या शिडीने आपण वर चढलो, ती शिडी फेकून देऊ नका. ओबीसींनी आरक्षण वाचवायचे असेल तर स्वतःचा राजकीय चेहरा उभा करावा लागेल. सध्या ओबीसींचा वापर फक्त मतदानासाठी होतो; मात्र सत्तेच्या किल्ल्या भाजप, रा.स्व.संघ आणि प्रस्थापितांच्या हातात आहेत.”
Crime in Amravati : शोधायला गेले बिश्नोई गँगचा शार्प शूटर; निघाला गरीब व्यावसायिक!
“पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नाही. पूर आणि पावसामुळे अनेकांचे घरातील अन्नधान्य व इतर साहित्य वाहून गेले. तरीही भाजप आणि रा.स्व.संघाच्या विचारसरणीत ‘मदत’ हा शब्दच नाही,” अशी टीका आंबेडकर यांनी केली.
“दिवाळीला मदत देऊ, अशी घोषणा सरकारने केली होती. मात्र प्रत्यक्षात ती मदत मिळणार नाही. शेतकरी व वंचित घटकांना मदत करायला भाजप आणि रा.स्व.संघ तयार नाहीत,” असा हल्लाबोल त्यांनी केला.