Dont give Rs 5 to farmers; Fadnavis warns : शेतकऱ्यांना पाच रुपये देण्याची दानत नाही; फडणवीसांचा इशारा
Loni : “सरकारकडून 10-10 हजार कोटी रुपयांची मदत घेता, पण नफ्यातून शेतकऱ्यांसाठी पाच रुपये देण्याची दानत नाही. शेतकऱ्यांचा काटा मारून पैसे साठवणारे कारखाने मी शोधून काढले आहेत, आता त्यांना दाखवतो,” असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
ते लोणी येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर आलेल्या नैसर्गिक आपत्तीची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. शेतकऱ्याला काळजी करण्याची गरज नाही. राज्य सरकार भरीव मदतीचा निर्णय घेणार आहे. कालच मी, अजित दादा आणि शिंदे साहेब बसून शेतकऱ्याला मदत कशी वाढवता येईल याचा आराखडा तयार केला आहे. आमच्या पाठीशी अमित भाई शाह आहेत. त्यांनी सांगितलं, काळजी करू नका, केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही लागेल ते आम्ही देऊ.
Amit Shah : अमित शाह यांची शिर्डीत फडणवीस, शिंदे अजितदादा सोबत मध्यरात्री गुप्त बैठक !
फडणवीस म्हणाले, “सहकारी साखर कारखान्यांचे मालक हे कारखानदार नाहीत, ते शेतकरीच आहेत. त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे. आम्ही जेव्हा कारखान्यांना शेतकऱ्यांसाठी काही निधी बाजूला ठेवायला सांगितलं, तेव्हा तो त्यांच्या नफ्यातून मागितला होता. शेतकऱ्याच्या एफआरपीतून नाही. एफआरपी हा शेतकऱ्याचा हक्काचा पैसा आहे, आणि नफा हा कारखान्याचा.
फडणवीस यांनी सहकारी कारखान्यांवर जोरदार टीका करताना म्हटलं,“काही कारखाने शेतकऱ्यांचा काटा मारून, म्हणजे वजनात फसवणूक करून पैसा साठवतात. पण जेव्हा शेतकऱ्यांसाठी थोडे पैसे दे म्हटलं, तर त्यांच्यात दानत नाही. सरकारकडून 10-10 हजार कोटी घेतात आणि शेतकऱ्याला 25 लाख देताना हात थरथरतात. हे चित्र बदललं पाहिजे.”
Electricity tariff hike : दिवाळीच्या तोंडावर वीजदरवाढीचा ‘शॉक’!
फडणवीस म्हणाले, जे लोक आमच्यावर टीका करत आहेत, त्यांनी एकदा आरशात बघावं. तुम्ही सत्तेत असताना काय केलं, ते आठवा आणि मग आम्हाला प्रश्न विचारा. आम्हाला खुर्च्या तोडायला नाही, तर शेतकऱ्यांची सेवा करायला लोकांनी निवडून दिलं आहे. आणि हे काम केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही.””
या वेळी फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त भागासाठी मोठा पाणीप्रकल्प राबवण्याचा निर्धार व्यक्त केला खोऱ्यातील 54 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणणार. यामुळे नगर, नाशिक आणि मराठवाडा दुष्काळमुक्त होईल, असं ते म्हणाले.
Gogawale on kadam : कोणाच्या मनात काय आहे ते कोणी सांगू शकत नाही !
फडणवीस म्हणाले, “सहकार क्षेत्र मजबूत करण्यासाठी अमित भाई शहा यांनी पहिल्याच वर्षी ऐतिहासिक निर्णय घेतले. त्यांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्रासाठी 8 ते 10 हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले. हे पैसे राज्यातील सहकारी संस्था बळकट करण्यासाठी वापरले जाणार आहेत.
____